• Tue. Jan 7th, 2025
    ‘देव शपथे’चा शहरात हर्षोल्हास, सगळीकडे दिवाळी; ठिकठिकाणी फुटले फटाके, चॉकलेट-मिठाई वाटून आनंद साजरा

    Nagpur Celebration After Devendra Fadnavis CM Oath : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरात दिवाळी साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी फटाके वाजवत, ढोल-ताशे वाजवून तसंच मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.

    ‘देव शपथे’चा शहरात हर्षोल्हास, सगळीकडे दिवाळी; ठिकठिकाणी फुटले फटाके, चॉकलेट-मिठाई वाटून आनंद साजरा

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याने सकाळपासूनच नागपूरकरांमध्ये असलेली उत्कंठा गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आणखीच शिगेला पोहोचली होती. साडेपाचच्या ठोक्याला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीताने या शपथविधी सोहळ्याची सुरुवात होताच, चौकाचौकात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर ‘देव शपथ’विधीचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी रस्त्याने जाणारा प्रत्येक जण थांबला. फडणवीसांनी शपथ घेताच कोणी फटाके फोडत, कोणी चॉकलेट आणि पेढे वाटत, तर काहींनी ढोलताश्यांवर थिरकत ‘देवेंद्र पर्वा’चे स्वागत केले.
    ‘इंदिरा कॉन्व्हेंट’मध्ये शिकण्यास मनाई ते मैं समंदर हूं लौटकर आऊंगा…; नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल या गोष्टी माहित्येत?

    देवाभाऊ शपथ घेणार, नागपूकरांमध्ये उत्साहाचे वातावरण

    महायुतीला बहुमत येऊनही मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अखेर बुधवारी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्यानंतर संपला. त्यामुळे पुन्हा एकदा आपला देवाभाऊ शपथ घेणार असल्याने नागपूकरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासूनच घरोघरी, चहाच्या टपऱ्या, शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये याचीच चर्चा होती. मुंबईत आझाद मैदानावर भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने आणि सोहळा दुपारी ३ वाजल्यापासूनच सुरू झाल्याने मोबाइलवर, कार्यालयातील कम्प्युटर स्क्रीनवर अनेकांनी त्याचे प्रक्षेपण सुरू केले.
    अजित पवारांच्या नावावर झाला अनोखा विक्रम; याबाबत दादांच्या जवळपास कोणी नाही, असा आहे त्यांचा A to Z राजकीय प्रवास
    शहरातही नागपूरकरांना शपथविधी बघता यावा, यासाठी भाजपच्यावतीने सर्वच विधानसभा मतदारसंघांत सार्वजनिक ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजल्यापासूनच या स्क्रीनवर शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. फडणवीसांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिममध्ये तर लक्ष्मीनगर, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, खामला, साईमंदिर, देवनगरसह ठिकठिकाणी सामूहिकपणे शपथविधी पाहता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

    लक्ष्मीनगर चौकात फडणवीसांनी शपथ घेताच आतषबाजीला सुरुवात झाली. तर ‘देवाभाऊ, देवाभाऊ आपला लाडका देवाभाऊ’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा याठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनी देत हा आनंद साजरा केला. यावेळी माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीसांनी शपथ घेताच काहींनी एकमेकांना पेढे भरवले, तर आसपासच्या दुकानदारांनी चॉकलेट वाटत हा आनंद साजरा केला.

    मध्य नागपुरात आतषबाजी

    गजबजलेल्या बाजारपेठा आणि वस्त्यांचा भाग असलेल्या मध्य नागपुरातही बडकस चौक, दक्षिणामूर्ती चौकात शपथविधी सोहळा पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणात फटाके फुटल्याने दिवाळी असल्यासारखेच वातावरण भासत होते.
    देवेंद्र फडणवीसांनी केलेलं मॉडेलिंग शूट, थेट दिल्लीतून बोलावणं आलेलं… काय आहे या फोटोमागची स्टोरी
    पूर्व नागपुरातही फडणवीसांच्या शपथविधीचा जल्लोष नागरिकांनी उत्साहात साजरा केला. यावेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना मिठाई वाटण्यात येत होती. पश्चिम नागपुरातही शंकरनगर चौक, धरमपेठ, गोकुळपेठ, लक्ष्मीभुवन चौकासह फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हातात भाजपचे झेंडे घेऊन कार्यकर्ते नाचत होते. तर बजाजनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला. तर राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वात दुपारी व्हरायटी चौकातही फटाके उडवत आणि ढोलताशे वाजवत आनंद साजरा करण्यात आला.

    ‘देव शपथे’चा शहरात हर्षोल्हास, सगळीकडे दिवाळी; ठिकठिकाणी फुटले फटाके, चॉकलेट-मिठाई वाटून आनंद साजरा

    रुक, थोडी देर मे जाते…

    एरवी घडाळ्याचा काटा सायंकाळी पाचच्या पुढे गेल्यावर शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची घराकडे जाण्याची लगबग सुरू होते. मात्र, गुरुवारी काहीसे वेगळे चित्र होते. अनेकांच्या मोबाइल स्क्रीनवर शपथविधी सोहळा पाहण्यात येत होता. तर काही कर्मचाऱ्यांकडून तर कामासोबतच कम्प्युटरच्या स्क्रीनवर हा सोहळा बघण्यात येत होता. तसेच पुन्हा एकदा राज्याची सूत्रे नागपूरकर व्यक्तीकडे आल्याने प्रत्येकजण याचीच चर्चा करत होते. देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात आगमन झाल्यावर कसे जंगी स्वागत होणार, याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed