• Fri. Dec 27th, 2024
    महायुतीच्या विजयाचे शिल्पकार अखेर मुख्यमंत्रिपदी, देवा भाऊंच्या पाच वर्षांच्या संघर्षाला यश

    Maharashtra New CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या नावावरून असलेला सस्पेंस संपला आणि देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून आता त्यांच्या राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे. ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा’​, हे शब्द फडणवीसांनी खरे करू दाखवले आहे.

    हायलाइट्स:

    • देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं
    • देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.
    • भाजपच्या विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

    Devendra Fadnavis: समदंर लौट आया! महायुतीच्या विजयाचे शिल्पकार अखेर मुख्यमंत्रिपदी, देवा भाऊंच्या पाच वर्षांच्या संघर्षाला यश

    मुंबई : विदर्भातून महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान मिळवलेले देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विजयी नेते देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवीन मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा,’ ही ओळ देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली सांगितली होती. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी निवडून आले आणि पाच वर्षे जुनी ओळ अगदी बरोबर असल्याचे सिद्ध होत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्ण दर्जा आणि प्रभावाने परतले आहेत.देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास
    विधानसभा निवडणूक अपेक्षेपेक्षा घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराषट्राची सूत्रे देवेंद्र फडणवीसांच्या हाती देण्याचा महायुतीकडून अंतिम निर्णय करण्यात आला असुंन असून भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांना काही काळ अस्वस्थ केले तरी, फडणवीस आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांनी शरणागती पत्करली नाही आणि शेवटी मुख्यमंत्रीपदाची शर्यत जिंकली. जाणून घेऊया कोण आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा होता.
    गटनेतेपदी निवड झाल्यावर पहिल्या भाषणात फडणवीसांनी आमदारांना स्पष्टच सांगितलं, आता…
    फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या उगवत्या सूर्यासारखे आहेत. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने राज्यात २०१४ मध्ये सत्तास्थापनेचा दुष्काळ संपवला आणि आपल्या कार्यकाळाची पाच वर्षे पूर्ण करणारे भाजपचे एकमेव मुख्यमंत्री ठरले. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीयप्रवास आमदार किंवा मुख्यमंत्री पदापासून सुरू झालेला नाही तर लहान वयापासूनच राजकारणात सक्रिय होते.

    अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे (अभाविप) सक्रिय सदस्य म्हणून फडणवीस यांनी मोलाची भूमिका बजावली तर अभाविपचे सदस्य असतानाच सर्वप्रथम महापालिका सभागृहात नगरसेवक झाले. त्यानंतर अवघ्या पाच वर्षांनी नागपूरचे महापौर झाले. त्यांनी मराठा आंदोलन चांगल्या पद्धतीने हाताळले ही त्यांची क्षमता आहे.
    Maharashtra CM Devendra Fadnavis: भगवा रंग, सोनेरी काठ; निवड होण्यापूर्वीच फडणवीसांच्या फेट्याने दिलेले मुख्यमंत्रिपदाचे संकेत
    फडणवीस यांचा अनोखा रेकॉर्ड
    वयाच्या ४४ व्या वर्षी फडणवीस राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले असून १९९९ आणि २०१४ मध्ये दक्षिण नागपूर मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर भाजपने आपला नेता म्हणून त्यांची निवड केली. १९६० मध्ये राज्याच्या निर्मितीनंतर १७ वेगवेगळे मुख्यमंत्री बनले पण केवळ दोनच कार्यकाळ पूर्ण करू शकले आणि देवेंद्र फडणवीस त्यापैकी आहेत. याआधी केवळ काँग्रेसचे वसंतराव नाईकच त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले होते. त्याचवेळी, फडणवीस यांचा संघाशी सक्रिय संबंध राहिला असून गेल्या तीन दशकापासून सक्रिय राजकारणात आहेत.
    आताची सर्वात मोठी बातमी! ते पुन्हा आले, भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
    तसेच सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्डही फडणवीसांच्या नवे आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आल्यावर फडणवीस यांनी पुनरागमनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. एकेकाळी अजित पवारांचा पाठिंबा घेऊनकाही आमदार फोडून सरकार स्थापन करतील, असे वाटत होते. २३ नोव्हेंबर २९१८ रोजी त्यांनी शपथही घेतली पण शरद पवारांच्या रणनीतीला खीळ बसली आणि अजित पवारांनी यूटर्न घेतला. यामुळे अवघ्या ७२ तासांनी फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला.

    प्रियांका वर्तक

    लेखकाबद्दलप्रियांका वर्तकमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर मी कार्यरत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ७ वर्षाचा अनुभव आहे. क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व असून व्यापार क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड. भटकंतीसह बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाची विशेष आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed