Girish Mahajan: गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या बैठका रखडल्यानं सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालेला आहे. तोच पेच सोडवण्याचा प्रयत्न आता भाजपकडून सुरु आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, संकटमोचक अशी गिरीश महाजन यांची ओळख आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीहून परतलेले शिंदे त्याच दिवशी थेट गावाला निघून गेले. तिथे त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. साताऱ्यातील गावाता मुक्काम केलेले शिंदे रविवारी ठाण्यात परतले. पण त्यांनी आजच्या सगळ्या बैठका रद्द केल्या. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे शिंदे कोणालाही भेटत नसल्याचं समजतं.
Eknath Shinde: शिंदे उप होणार नाहीत, पण ते…; मोदींच्या मंत्र्यांचं विधान, भाईंना मोठं पद मिळणार?
शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं महायुतीच्या बैठका रद्द झाल्या. आता शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन शुभदीपवर पोहोचले आहेत. तिथे शिवसेनेचे काही माजी मंत्री, आमदार उपस्थित आहेत. महाजन शिंदे यांची भेट घेणार आहेत. सत्ता स्थापनेच्या हालचाली मंदावलेल्या आहेत. या घडामोडींना वेग देण्याचा प्रयत्न आता भाजपकडून सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून महाजन ठाण्यात शिंदेंच्या घरी गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला आहे. निकाल लागल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. पण त्यानंतर त्यांनी दोन दिवस मौन बाळगलं. या कालावधीत शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी पुन्हा एकदा शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, असा सूर लावला. यानंतर शिंदे माध्यमांसमोर आले. दोन दिवस मौन राहिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सत्ता स्थापनेचा निर्णय भाजप नेतृत्त्व घेईल. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असं शिंदे म्हणाले.
Eknath Shinde: गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका
मुख्यमंत्रिपदावरील दावा शिंदेंनी सोडल्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा आहे. गुरुवारी रात्री शिंदे दिल्लीला गेले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. दिल्लीवरुन परतताच मुंबईतील बैठकांना न जाता शिंदे थेट गावाला निघून गेले. तिथे त्यांनी मुक्काम केला. तब्येत बरी नसल्यानं त्यांनी भेटीगाठी टाळल्या. आज ठाण्यात आल्यानंतरही शिंदे कोणालाही भेटत नाहीएत. त्यामुळे शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.