• Fri. Dec 27th, 2024
    EVMविरोधातील लढ्यात ‘वंचित’चीही आघाडी; मोहीम होणार धारदार, निवडणूक आयोगाला घेरणार

    Vanchit Bahujan Aghadi protest against EVM: ईव्हीएमवरुन निवडणूक आयोग सर्वच राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आहे. यातच वंचित बहुजन आघाडीनेही आता ईव्हीएमविरोधात जनआंदोलनाची हाक दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अकोला : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाला आहे. तर राज्यातील सर्व राजकीय पक्षांचा सुपडासाफ झाला आहे. यामध्ये महायुतीतील घटक पक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएमवरुन निवडणूक आयोग सर्वच राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आहे. यातच वंचित बहुजन आघाडीनेही आता ईव्हीएमविरोधात जनआंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधातील मोहिमेला आता आणखी धार चढण्याचे संकेत आहेत.

    वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएमविरोधी जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. ज्याची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेपासून होणार आहे. तर पुढे टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर असे सलग पंधरा दिवस राज्यभर ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
    Vaibhav Naik : फेर मतमोजणीची मागणी करणार नाही, झालेला पराभव मला मान्य; वैभव नाईकांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर
    दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएमविरोधातील या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याआधीही ईव्हीएम प्रणालीमधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. तर आता विधानसभा निवडणूक निकालातून चकीत करणारे आकडे समोर आले असता वंचितने आता थेट ईव्हीएमविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

    वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

    ईव्हीएविरोधात मविआचे नेते आक्रमक

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed