मध्य नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शेळके यांनी नाना पटोले यांना आरएसएसचे एजंट म्हटले होते. तसेच निवडणुकीत मदत न केल्याचा आरोपही केला. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बंटी शेळके यांच्यावर अनुशासनहीनतेचा आरोप करत “तुम्हाला पक्षातून बाहेर का काढू नये” अशी नोटीस देत त्यांना दोन दिवसांत उत्तर मागितले आहे. त्याला उत्तर देत बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बंटी शेळके म्हणाले, उत्तर तर मी याचा अगोदर बरेचदा दिलेले आहे, आणि मी त्यांना जाब पण विचारलं आहे , त्यांना प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर मला आज पर्यंत मला मिळालेलं नाही.