Maharashtra New CM : महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार असून मुख्यमंत्री कोण होणार याची सध्या चर्चा असताना राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदेंच्या नावाचा विचार सुरू
महाराष्ट्रातल्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. अशात जनमताचा अनादर होऊ नये, असाही एक मतप्रवाह भाजपाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा तापवला आहे, अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा ही पुन्हा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्ली दरबारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता या सगळ्याचाही गांभीर्याने विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा असावा
भाजपाला १३३ जागा मिळाल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा, भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद जावं अशी भाजपतील आमदारांची आणि नेत्यांची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर असून त्यांचा प्रशासनातील अनुभव मोठा आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत अशी अनेकांची इच्छा आहे.
महाराष्ट्राला ५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार; आझाद मैदानावर PM मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा
याचवेळी शिंदेसेनेतील आमदारही एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, या मतावर ठाम आहेत. सामान्य जनतेतील अनेकांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नावाला पुन्हा पसंती दिली जात आहे, तर काहींकडून भाजपला जास्त जागा मिळाल्याने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावेत, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा असावा यासाठी भाजपचे हाय कमांड गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली गेली आहे.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?
भाजपकडून या नावाचाही विचार
मराठा फॅक्टर समोर आल्यास आशिष शेलार यांच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो, की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब होतो, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.