Ladki Bahin: विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतांचं भरभरुन दान टाकलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे बहुतांश महिलांनी महायुतीला मतदान केलं.
न्यूज १८नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये किमान ४ महिला असू शकतात. महायुतीच्या मागील सरकारमध्ये केवळ एकमेव महिला मंत्री होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाची जबाबदारी होती. आता नव्या सरकारमध्येही त्या कायम राहण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde: सत्ता स्थापनेचा पेच असताना शिंदे अचानक गावाला रवाना; महायुतीची बैठक रद्द; नेमकं चाललंय काय?
महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपकडून सर्वाधिक महिला आमदारांना मंत्रिपदी संधी मिळू शकते. भाजपच्या १३२ पैकी आमदारांपैकी १४ महिला आहेत. यातील काही आमदार सातत्यानं निवडून आल्या आहेत. त्यांची माहिती केंद्रीय नेतृत्त्वाकडून मागवण्यात आलेली आहे. दिल्लीतूनच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडूनही किमान एका महिला आमदाराला मंत्रिपदात संधी मिळू शकते.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी चांगली साथ दिली. त्यामुळेच महिलांना मंत्रिमंडळात अधिक प्रमाणात प्रतिनिधीत्व दिलं जाणार आहे. महिलांच्या नेतृत्त्व गुणांना संधी देण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसत आहे. महिलांना मंत्रिमंडळात अधिक प्रमाणात स्थान दिल्यास त्या महिलांच्या प्रश्नांना अधिक योग्यरितीनं आणि प्रभावीपणानं न्याय देऊ शकतील.
गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या १४ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यात श्वेता महाले, मेघना बोर्डिकर, देवयानी फरांदे, मंदा म्हात्रे, सीमा हिरे, विद्या ठाकूर, मनिषा चौधरी या अनुभवी आमदार आहेत. याशिवाय श्रीजया चव्हाण, स्नेहा पंडित असे नवे चेहरे भाजपकडून विधानसभेत गेले आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अदिती तटकरेंना पुन्हा एकदा मंत्रिपदी मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या मंत्रिमंडळातही त्या होत्या. याशिवाय सरोज अहिरे, सना मलिक राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या आहेत. शिवसेनेकडून मंजुळा गावित, संजना जाधव विधानसभेवर गेल्या आहेत.