• Thu. Nov 28th, 2024

    सत्ता स्थापनेबाबत अमल महाडिक यांचे मोठे वक्तव्य; एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय,लवकरच…

    सत्ता स्थापनेबाबत अमल महाडिक यांचे मोठे वक्तव्य; एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय,लवकरच…

    Kolhapur News: राज्यात लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होईल, सरकार स्थापन करण्यात कोणताही विलंब झालेला नसल्याचे कोल्हापूर उत्तरचे आमदार अमल महाडिक यांनी गुरुवारी सांगितले.

    Lipi

    कोल्हापूर (नयन यादवाड): राज्यात सत्ता स्थापनेमध्ये कोणताही विलंब झालेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन तिन्ही नेते निर्णय घेतील आणि लवकरच सत्ता स्थापन होईल. तसेच जिल्ह्यात मंत्री पदासाठी कोणताही आग्रह आम्ही केला नसल्याचे कोल्हापूर दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात रिंग रोड येथे रस्ते विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

    राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांनी काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील यांचा पराभव करत निवडून आले आणि अवघ्या आठवडाभरातच कामाला सुरुवात देखील केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डेमय झालेला रिंग रोडच्या कामाचं शुभारंभ आज अमल महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या रस्त्यासाठी शासनाकडून दोन कोटी आणि जिल्हा नियोजनमधून एक कोटी 45 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून यातील पहिल्या टप्प्यातील २ किलोमीटरच्या कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे.

    यावेळी बोलताना अमल महाडिक म्हणाले, आमदार झाल्या नंतर दुसरा दिवस संविधान दिन होता आणि या संविधानाला अभिवादन करून कामाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षात प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे काम आम्ही करणार आहोत. आज या कामाचा शुभारंभ करत आहोत. आणखी निधी लागणार आहेत यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर निधी मंजूर करून घेऊ. शहरातील सर्व रस्त्यांसाठी 50 कोटी रुपयांची आम्ही मागणी केलो आहोत. लवकरात लवकर हा निधी आणून शहरातील रस्ते नीट करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही आमदार अमल महाडिक म्हणाले आहेत.

    तर सत्ता स्थापनेसाठी कोणताही विलंब होत नाहीय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भूमिका स्पष्ट केली आहे. काही गोष्टी वरिष्ठ लेवलला ठरवण्यात येत असतात यामुळे तिन्ही नेते मिळून लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार आहेत. तसेच भाजपच्या सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी भूमिका घेतलेली आहे यासंदर्भात वरिष्ठांना देखील आम्ही कळवलेला आहे. यामुळे वरिष्ठ आम्ही केलेल्या मागणीला संमती देतील ,असा विश्वास ही अमल महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

    जयकृष्ण नायर

    लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed