Pune Junnar Assembly Election Result: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार यांनी दोन पक्ष स्थापन केले. अजित पवारांनी पक्षाने चिन्ह हे दोन्ही शरद पवार कडून खेचून घेतले.
हायलाइट्स:
- जुन्नरमध्ये ना साहेब, ना दादा फक्त शरददादा..!
- अतुल बेनके, सत्यशील शेरकर यांचा पराभव
- जुन्नरमध्ये काय घडलं?
Chandrapur News: काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला; चंद्रपुरात सहापैकी फक्त एका जागेवर मिळविला विजय
विधानसभेचा प्रचार सुरू असताना अतुल पिंट्या आणि सत्यशील शेरकर यांची चर्चा सुरू असताना या विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद सोनवणे यांनी बाजी मारली आहे. अपक्ष उमदेवार शरद सोनावणे यांनी 73 हजार 355 मते मिळवत विजय मिळवला. सत्यशील शेरकर यांना 66 हजार 691 तर अनुल बेनके यांना 48 हजार 100 मते मिळाली आहेत. तर अपक्ष असलेल्या आशा बुचके यांना 9 हजार 435 तर वंचित बहुजन आघाडीचे देवराम लांडे यांना 22 हजार 401 मते मिळाली आहेत.
कोण आहेत शरद सोनवणे?
2014 च्या निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर शरद सोनवणे हे मनसेकडून राज्यातील एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच 2019 च्या निवडणुकीत सोनवणे यांचा पराभव झाला होता. मात्र काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकत दाखवून देत विजय मिळवला.