• Mon. Nov 25th, 2024
    एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा पराभव, एकाचा लोकसभा तर दुसऱ्याचा विधानसभेत पराभव

    Nanded Vidhan Sabha and Loksabha By-Election: काँग्रेसचे मोहन हंबर्डे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे हे सख्ख्ये भाऊ आहेत. काँग्रेसने मोहन हंबर्डे यांना नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती.

    हायलाइट्स:

    • एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा पराभव
    • एकाचा लोकसभा तर दुसऱ्या भावाचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव
    • नांडेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं?
    Lipi
    दोन्ही भावांचा विधानसभा लोकसभा निवडणुकीत पराभव

    अर्जुन राठोड, नांदेड : शनिवारी विधानसभेसोबतच लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा धक्कादायक निकाल लागला आहे. मतदारांनी विद्यमान आमदारासह अनेकांना नाकारलं आहे. त्यातच एकाच घरातून काँग्रेस आणि भाजपकडून विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक लढवत असलेल्या दोन सख्ख्या भावांचा देखील या निवडणुकीत निसटता पराभव झाला आहे. संतुक हंबर्डे यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत तर काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहन हंबर्डे या यांचा विधानसभेच्या निवडणूकीत पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे मोहन हंबर्डे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे हे सख्ख्ये भाऊ आहेत. काँग्रेसने मोहन हंबर्डे यांना नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. तर रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या भावाला म्हणजेच संतुक अहंबर्डे यांना मैदानात उतरवले होते. दोन्ही भाऊ निवडणुकीच्या मैदानात असल्याने चर्चेचा विषय बनला होता. एक भाऊ भाजप आणि दुसरा भाऊ काँग्रेस कडून निवडणूक लढवत असल्याने विविध चर्चेला उधाण देखील आलं होतं. दरम्यान भावाला उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार मोहन हंबर्डे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप नेत्यांनी पक्ष फोडलं त्यानंतर आता भावाला निवडणुकीत उतरवून आमचं घर फोडलं असा आरोप हंबर्डे यांच्याकडून करण्यात आला.
    Nanded By Poll : 800 मतांनी काँग्रेस जिंकली, भाजपचा आक्षेप, फेरमोजणीत लीड थेट 1457 वर, नांदेड पोटनिवडणुकीत गेम कसा फिरला?

    प्रचारच्या काळात दोन्ही भावानी एकमेकांच्या विरोधात प्रचार केला. मात्र दोन्ही भावाला जनतेने नाकारल्याच पाहायला मिळालं. आमदार मोहन हंबर्डे यांचा शिवसेना शिंदे गटाचे आनंद बोढारकर यांच्याकडून निसटता पराभव झाला. तर लोकसभा पोट निवडणुकीत संतुक हंबर्डे यांचा एवढ्या एक हजार ४५७ मतानी पराभव झाला. संतुक हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३३१ मतं पडली तर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८ एवढी मतं पडली. पोस्टल मतमोजणीत रविंद्र चव्हाण यांचा विजय झाला. दरम्यान एकाच घरातील दोन सख्ख्या भावाचा पराभव झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *