• Sun. Nov 24th, 2024
    Parli Assembly Election Result 2024: परळीमधून धनंजय मुंडे विजयी

    Parli Dhananjay Munde vs NCP sharad pawar rajesaheb deshmukh Vidhan Sabha Election 2024 Result : परळी विधानसभेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात मुख्य लढत बघायला मिळतंय.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    परळी : विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. विशेष: मराठवाड्याच्या निकालाकडे. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे विरूद्ध शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात मुख्य लढत बघायला मिळतंय. दरवेळी पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत रंगते. मात्र, महायुतीमध्ये ही जागा धनंजय मुंडे यांच्याकडे गेलीये. पंकजा मुंडे स्वत: धनंजय मुंडेंचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या. राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले. बीड जिल्हाचे पालकमंत्री म्हणूनही धनंजय मुंडे यांनी काम बघितले आहे. परळी हा गोपीनाथ मुंडे यांचा बाल्लेकिल्ला होता. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी येथील निवडणूक लढवली. आता समीकरणे बदलली आणि धनंजय मुंडे हे निवडणूक लढवली.

    आता परळीचा निकाल येताना दिसतोय. तीस हजार मतांनी धनंजय मुंडे हे आघाडीवर दिसत आहेत. राजेसाहेब देशमुख हे पिछाडीवर आहेत. धनंजय मुंडेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची नक्कीच आहे. त्यामध्येच आता त्यांची आघाडी ही काम दिसत आहे. धनंजय मुंडे हे सुरूवातीपासूनच आघाडीवर आहेत. आता धनंजय मुंडे यांची लीड चांगलीच वाढताना दिसत आहे. परळी मतदारसंघात 11 व्या फेरी धनंजय मुंडे यांना 64397 मतांची आघाडी मिळाली आहे.

    65 मतांनी धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. जवळपास धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित असल्याचे बघायला मिळतंय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख हे उतरले होते. आता धनंजय मुंडे हे विजयी झाले आहेत.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *