• Mon. Nov 25th, 2024
    Sakoli Assembly Election Result 2024: नाना पटोले की अविनाश ब्राह्मणकर, कोण मारणार बाजी?

    Sakoli Congress Nana Patole vs BJP Avinash Bramhankar Vidhan Sabha Election 2024 Result: साकोली येथून काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात चुरशीची लढत असून, दोघांपैकी कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    Maharashtra Sakoli Assembly Election Result 2024 in Marathi

    साकोली – साकोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. साकोली येथून महायुतीने भाजपचे अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे.
    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांना ४१.६३%मते मिळाली असून भाजपच्या परिणय रमेश फुके यांच्यावर ३८.९०% मते मिळवून विजय मिळवला. या वर्षी महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात निवडणूका झाल्या. त्यामुळे आता नाना पटोले आणि अविनाश ब्राह्मणकर यांच्यात कडवी लढत असल्यामुळे साकोली येथून कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

    काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर. नाना पटोले दुसऱ्या फेरीत ६८७ मतांनी आघाडीवर तर अविनाश ब्राह्मणकर पिछाडीवर. चौथ्या फेरीत नाना पटोले ४५१ मतांनी आघाडीवर. पाचव्या फेरीत नाना पटोले ३५९ मतांनी आघाडीवर

    तेजश्री कुलये

    लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed