Pune Junction Upgrade: पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भविष्यात वाढणारी प्रवासी संख्या हाताळण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मोठे अपग्रेड करण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते या कामांची पायाभरणी झाली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: रेल्व मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या रिमॉडलेंसाठी पायाभरणी केली असून आता येत्या काही वर्षांमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचं चित्रचं बदलणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त स्थाकांपैकी एक असलेल्या पुणे जंक्शन स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कर्माचारी आणि विद्यार्थी दररोज या स्थानकावरून प्रवास करतात. अशा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवणार
पुणे जंक्शन रेल्वे स्थानकावर सध्या लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेससाठी सहा प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत. यापैकी फक्त दोन फलाटांवर 22 डब्यांच्या गाड्या थांबू शकतात. यामुळे फलाटांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. याशिवाय प्रवेश आणि बाहरे पडण्यासाठी केवळ दोन जागा उपलब्ध असून तीन पादचारी पूल आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज 200हून अधिक लोकल रवाना आणि दाखल होतात. त्यामुळे दीड लाखांहून अधिक प्रवासी दररोज स्थानकावर येतात. राज्यातील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी हे एक आहे.
Pune Metro: पुणेकर प्रवाशांना दिलासा; हिंजवडी मेट्रोबाबत प्रशासनाकडून मोठी घोषणा, वेळापत्रक जाहीर, १२ स्थानके कधीपर्यंत पूर्ण होणार?
येत्या काही वर्षांमध्ये प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जंक्शनची क्षमता वाढवण्याची मोठी गरज आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर सहा नवे प्लॅटफॉर्म आणि प्रवेशासाठी तिसरं द्वार उभारण्याचं काम हाती घेतलं आहे. यासर्वासाठी एकूण 473 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्लॅटफॉर्म 7 ते प्लॅटफॉर्म क्रमांक 12 असे सहा फलाट बांधण्यात येणार आहे. याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3,4,5 आणि 6ची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे 24 ते 26 डब्यांच्या ट्रेनची वाहतूक हाताळणंही शक्य होणार आहे.
उपनगरिय रेल्वे आणि मेल/एक्सप्रेसची वाहतूक विभागणार
याशिवाय 2 अप आणि डाऊन आर अँड डी लाइन बांधण्यात आल्या असून यामुळे ट्रेनची वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे. शिवाय एक तिसरी हडपसर ते घोरपडी कोचिंग मेंटेनंन्स कॉप्म्लेक्सपर्यंत लाइन बांधण्यात येत आहे. उनगरिय रेल्वे आणि लांब पल्ल्यांच्या ट्रेनची वाहतूक विभागण्यासाठी ही मार्गिका महत्त्वाची ठरणार आहे.
Pune-Bengaluru Highway: पुणे-बंगळुरू महामार्गावर कोंडी फुटणार, कराड पुलाचं काम अंतिम टप्प्यात; कुठून-कुठे मार्ग?
प्रवाशांचा स्थानकावरील अनुभव सुधारण्यासाठी नव्या फलाटांसह प्लॅटफॉर्मवर निवाऱ्यासाठी ठिकाणं, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पंखे, इंडिकेटरसह अनेक सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय पुणे रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ‘पॅसेंजर होल्डिंग एरिया’ तयार करण्यात येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा