• Mon. Nov 25th, 2024

    विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का; करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 22, 2024
    विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का; करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान – महासंवाद




    मुंबई, दि. २२: महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे 30 वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान टक्केवारीस राज्यातील मतदार हा नक्कीच अभिनंदनास पात्र ठरला आहे.

    यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वांधिक दिसून येतो.

    महाराष्ट्र राज्याच्या 288 मतदारसंघाकरिता राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यात 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार तर 6 हजार 101 इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या  निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदार आहेत. यात प्रत्यक्ष मतदानात 3 कोटी 34 लाख  37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.

    288 मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वाधिक 84.96 टक्के मतदान करवीर मतदारसंघात झाले तर सर्वात कमी 44.44 टक्के मतदान कुलाबा मतदारसंघात झाल्याची नोंद आहे.

    ०००

    श्री. संजय ओरके/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed