Chhagan Bhujbal: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महायुती सत्ता टिकवणार की महाविकास आघाडी सत्तांतर घडवणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
छगन भुजबळ यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला मनमाडला भेट दिली. निकाल काय लागू शकतो याबद्दल त्यांची कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. नांदगावात दोन दिवसांपूर्वी, मतदानाच्या दिवशी शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कांदे यांनी तर आज तुझा मर्डर फिक्स म्हणत भुजबळांना थेट धमकी दिली. कांदे, भुजबळ यांच्यात झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. यानंतर आता भुजबळांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
Maharashtra Election 2024 Exit Poll: महायुती ११२, मविआ १०४ अन् तब्बल ६१ जागा…; नव्या एक्झिट पोलनं सत्ताधारी, विरोधकांना धडकी
पोलीस प्रेशरखाली आहेत आणि विकले गेलेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या घरी, काऊंटिंग एजंटच्या घरी जाऊन पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांना काय करायचंय? त्यांनी काऊंटिंग एजंट म्हणून उद्या जायचंय की नाही, ते तरी पोलिसांनी सांगावं. पोलिसांनी पोलिसांचा धर्म पाळावा. २४ तास तर असे निघून जातील. काऊंटिंगला जाणाऱ्या एजंट्सना पोलिसांनी त्रास देऊ नये, असं भुजबळ माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
Maharashtra Election 2024: निकालाआधी धमाका, सर्वात हॉट मतदारसंघात ठाकरेंचा भाजपला धक्का; महत्त्वाचा नेता शिवबंधनात
येवल्याच्या निकालाची चिंता वाटत नाही. तिथून मी ६० ते ७० हजारांच्या फरकानं विजयी होईन, असा विश्वास भुजबळांनी बोलून दाखवला. ‘मी नांदगावात समीर भुजबळांची भेट घेतली. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. मतदान प्रतिनिधींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. अनेकांना मारहाण केली जात आहे. कार्यकर्ते डोळ्यांत अश्रू आणून त्यांची आपबिती सांगत आहेत. पोलीस प्रेशरखाली आहेत. ते विकले गेले आहेत,’ अशा शब्दांत भुजबळांनी त्यांचा संताप व्यक्त केला.