Maharashtra Exit Poll 2024: विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. या पोलनुसार एकनाथ शिंदे यांंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला २५ ते ४० दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात २०१९च्या निवडणुकीत युतीला स्पष्टबहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि मग महायुतीचे सरकार अशा पार्श्वभूमीवर मतदान झाले. या काळात शिवसेना दोन भागात विभागली गेली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह राहिले. आता २३ तारखेनंतर राज्यात कोणाची सत्ता देणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता लागली आहे.
निकालाच्या आधीचा निकाल! काय सांगतोय महाराष्ट्राचा पोल ऑफ पोल्स; राज्यात कोणाचे सरकार येणार? सर्वात ताजा अंदाज
विविध एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप हाच सर्वात मोठा राजकीय पक्ष असेल. अशात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील का? भाजपने गेल्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडले तसे त्यावेळी सोडतील याबाबत शंकाच आहे. त्यातच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार विधानसभेच्या ८१ जागा लढलेल्या शिंदे गटाला भाजपच्या तुलनेत फार जागा मिळतील असे दिसत नाही.
Peoples Pulseच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला ५२ जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. याच पोलमध्ये भाजपला ११३ जागा मिळतील असा अंदाज आहे. म्हणजे शिंदे गटापेक्षा भाजपला दुप्पट जागा आहेत. Matrizeच्या एक्झिट पोलनुसार शिंदे गटाला ३७ ते ४५ जागा मिळतील तर भाजपला ८९ ते १०१ जागा या ठिकाणी देखील भाजपला शिंदे गटापेक्षा दुप्पट जागा असल्याचे दिसते. पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला २७ ते ५० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. एकूणच शिवसेना शिंदे गटाला २५ ते ४० जागा मिळतील असा अंदाज आहे.
Maharashtra Exit Poll: या एक्झिट पोलने मविआच्या पोटात गोळा आला, राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार! सर्वात मोठा पक्ष कोण?
एक्झिट पोलचे अंदाज जर बरोबर ठरले तर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक दिसते. दुसऱ्या बाजूला जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे ही पहिली पसंद आहे. या सर्व्हेनुसार राज्यातील ३२.२६ टक्के लोकांनी शिंदेंना मत दिले आहे. दुसऱ्या स्थानावर २२.१ टक्क्यांसह उद्धव ठाकरे, तर तिसऱ्या स्थानावर देवेंद्र फडणवीस आहेत.