Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या लेकराच्या बाजूने असलेल्या उमेदवाराला मतदान करा. तसेच आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान करू नका, असेही ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांवरही जोरदार टीका केली. सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवाली सराटीत मराठा समाजाचे उपोषण होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
पुढे जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्याला सोडू नका. आपल मत विजयाच्या बाजूने पडल पाहिजे. कोणी माझ्याबाजूला फोटो काढला याचा अर्थ मी कोणाला पाठिंबा दिला असा त्याचा अर्थ होत नाही. कोणी संभ्रम निर्माण करेल मी कुठेही टीम पाठवली नाही. कुठेही मेसेज पाठवला नाही. मराठा समाजाने संभ्रम करून घेऊ नका तुम्हीच मालक आहेत. आपला कोणालाही पाठिंबा नाही मालक मराठा समाजाला ठेवलं, असेही जरांगे यांनी म्हटले.
बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच- अजित पवारयावेळी जरांगे पाटील हे कालीचरण महाराज यांच्याबद्दल बोलताना दिसले. ते म्हणाले की, तो 100 टक्के राजकीय दलाल आहे. परत बोलला याचा अर्थ तो राजकीय नेत्यांची पाय चाटतो. त्याला हिंदू धर्माची काही घेणं देणं नाही. याला मराठ्यांचा प्रचंड तिरस्कार आहे. वढ्या – खोड्याला जन्मलेली पैदास आहे ही. पुढे ते म्हणाले की, मी मैदानात नाही जनतेच्या हातात आहे सगळं जनतेने अन्याय आणि अत्याचार विसरू नये.
अंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण होणार. अंतरवाली सराटीत राज्यातील मराठा बांधव सामूहिक उपोषण करणार. सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाची तारीख ठरवू, सरकार कोणतही येऊ द्या, असे जरांगे यांनी म्हटले म्हणजेच काय तर सरकार स्थापन झाल्यानंतर परत एकदा मराठा समाजाकडून उपोषण सुरू केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या उपोषणाचा फटका बसल्याचे काही ठिकाणी बघायला मिळाले.