• Tue. Jun 16th, 2026

    Vinod Tawde Video : विनोद तावडेंनी पैसे वाटले, हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप, म्हणतात आता २५ वेळा फोन करुन…

    Vinod Tawde Video : विनोद तावडेंनी पैसे वाटले, हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप, म्हणतात आता २५ वेळा फोन करुन…

    आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआने केला आहे. पैसे वाटतानाचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : विधानसभा निवडणुकीला एक दिवस बाकी असताना राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. विवांत या हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. विनोद तावडे पैशांच्या बॅग घेऊन हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेरलं असून भाजप आणि बविआ कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित आहेत. विनोद तावडे यांना लाज वाटायला पाहिजे. माफ करा जाऊन द्या, असं म्हणत त्यांनी मला २५ फोन केले. जे नियमाने आहे तशी कारवाई करावी. मला अगोदरच बातमी समजली होती की तावडे ५ कोट रूपये घेऊन येणार आहेत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना बोलवल्याचं क्षितिज ठाकूर यांनी सांगितलं.

    विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या ठिकाणी बविआच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला आहे. तावडे आता दुसऱ्या मजल्यावर असून खाली भाजप आणि बविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. विनोद तावडे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा उद्या सहा वाजेपर्यत त्यांना सोडणार नसल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed