Dharashiv Vidhan sabha Makarand Raje Nimbalkar: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांचे बंधू मकरंद राजेनिंबाळकर यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचं पारडं जड होणार आहे. परिणामी धाराशिवमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
कोण आहेत मकरंद राजेनिंबाळकर?
मकरंद राजे निंबाळकर हे धाराशिव नगरपालिकेचे सलग पंधरा वर्षे सदस्य होते. तसेच सलग सात वर्षे नगराध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या कार्य काळामध्ये त्यांनी धाराशिव शहरांमध्ये विविध विकास कामे केली आहेत. सन २०१० ते २०१४ यादरम्यान उजनी ते धाराशिव ११४ किमीची पाईपलाईन त्यांच्या कालखंडामध्ये आली. जवळपास १८० कोटीचा खर्च यांनी केला आहे.
बाबांनो रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा…! भर सभेत अजितदादा कार्यकर्त्यांना असे का म्हणाले?
यासोबतच धाराशिवमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. धाराशिव शहर तसेच धाराशिव तालुक्यासह कळंब तालुक्यातही त्यांची राजकीय पकड चांगली आहे. तसेच मकरंद राजे निंबाळकर यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग देखील या मतदारसंघात आहे. यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे.