Vinod Tawde Reaction On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध केल्यानंतर यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar : पवार साहेबांचे भले मोठे फलक लावले, निवडणुकीत साहेब उभे आहेत का? अजितदादांचा सवाल, भावनिक होऊ नका; दादांचं आवाहन
अजित पवारांच्या व्यक्तव्यावर विनोद तावडे काय म्हणाले?
बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर विनोद तावडे म्हणाले, की जेव्हा युती तयार होते, तेव्हा ती समान किमान कार्यक्रमांच्या आधारे तयार होते. अजितदादांनी जे सांगितलं ते त्यांच्या विचारांनुसार आणि त्यांच्या व्होटबँकेनुसार योग्य असू शकतं, पण राष्ट्र आणि महाराष्ट्राची प्रगती होण्याचा ज्यांचा विचार आहे, त्यांची मतं फुटतील, असं ते म्हणाले.
अशोक चव्हाण लेकीसाठी, तर सुनेसाठी खतगावकर मैदानात; नांदेडमध्ये सख्ख्या दाजी आणि मेव्हण्याची प्रतिष्ठा पणाला!
पुढे ते म्हणाले, महायुतीमधील प्रत्येक पक्षाकडे भाजप, शिवसेना आणि एनसीपीकडे आपल्या व्होट बँक आहेत आणि प्रत्येकाला आपली व्होट बँक समजेल त्या भाषेत बोलायचे आहे. जर एक महिना आधीची गोष्ट असती, तर चित्र अस्पष्ट होतं. कारण कोणता नेता कोणत्या पक्षाचा आणि आणि कोणत्या पक्षाचा नेता, कोणत्या दुसऱ्या पक्षात जातो, हेच अस्पष्ट होतं. पण आता हळूहळू गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. या निवडणुकीचे निकाल हे मायक्रो लेव्हल मॅनेजमेंटवर अधिक अवलंबून आहेत, आणि यावर भाजप आणि महायुतीने चांगलं काम केलं आहे.
त्यांच्या व्होटबँकेनुसार ते असू शकतं, पण…. अजित पवारांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोधानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया
भाजपच्या ९५ ते १०५ जागा येतील – तावडे
विनोद तावडे यांनी महायुतीच्या जागांबाबत बोलताना १५५-१६० जागा येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप ९५ – १०५ जागा जिंकेल, हा आकडा वाढूही शकतं असंही ते म्हणाले. तसंच आम्ही एक चांगलं बहुमत असलेलं सरकार स्थापन करण्यात यशस्वी होऊ असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.