Pankaja Munde: शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेत बोलताना भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी त्यांची महामंडळासंबंधीचीही इच्छा बोलून दाखविली आहे. आपल्याला ऊसतोडणी महामंडळ मिळाले की तुम्हाला काही मागायची वेळ येणार नाही असे त्या म्हणाल्या.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी मुंडे पाथर्डीत आल्या होत्या. ऊस तोडणी कामगारांची संख्या जास्त असलेल्या या मतदारसंघात मुंडे यांनी त्यांना साद घालत महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी राजळे यांच्यासह केंद्रीय मंत्री एस. पी सिंह बघेल, गुजरात राज्यातील आमदार महेश कासवाल, नवनाथ पडळकर, अर्जुन शिरसाठ, राहुल राजळे, सुवेंद्र गांधी, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, सुभाष बर्डे, अंकुशराव गर्जे, विष्णुपंत अकोलकर उपस्थित होते.
मकरंद पाटलांना आज झोप लागणार नाही, भर सभेत शरद पवारांनी काहीच शिल्लक ठेवले नाही; शेवटी गावचा सरपंच…
मुंडे म्हणाल्या, मी मंत्री असताना जेवढा निधी परळीला दिला त्यापेक्षा जास्त निधी पाथर्डीला दिला आहे. आता तुमची मुलगी राज्यात महायुतीचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. याचा तुम्हाला अभिमान पाहिजे. भूलथापांना बळी पडू नका. कोणी अडचणीत आणले तर मन छोटे करू नका. मी विधानपरिषेदेची आमदार झाले त्या वेळी राजळे यांनी मला मत दिले. राज्यातील अनेक उमेदवारांना पक्षांनी तिकीट दिले अन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. ती मी समर्थपणे पार पाडत महायुतीचे सरकार आणणार आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढा. एक एक आमदार महत्वाचा असल्याने राजळे यांना निवडून द्या, असे आवाहन मुंडे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पाडले म्हणून अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली; नांदेडच्या सभेत मुख्यमंत्र्याचे अजब वक्तव्य
राजळे म्हणाल्या, पंकजा यांचे माझ्यावर प्रेम असल्याने मी भाग्यवान आहे. स्व. मुंडे व माझ्या वडिलांची घनिष्ठ मैत्री होती. तीच मैत्री पंकजा यांनी सांभाळत मला आधार देण्याचे काम केले असल्याचे राजळे यांनी सांगितले.