• Mon. Nov 25th, 2024

    काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थाकरिता बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या धजीया उडवल्या; नितीन गडकरींचं टीकास्त्र

    काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थाकरिता बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या धजीया उडवल्या; नितीन गडकरींचं टीकास्त्र

    Maharashtra Election 2024: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इचलकरंजी झालेल्या सभेत काँग्रेसच्या संविधान बदलणार या खोट्या नेरेटिव्हवर जोरदार टीका केली. काँग्रेसने स्वार्थाकरिता बाबासाहेबांच्या संविधानाच्या धजीया उडवल्याचे ते म्हणाले.

    Lipi

    कोल्हापूर (नयन यादवाड) : 1975 साली देशात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली, त्याआधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधी यांची निवडणूक न्यायालयाने अवैध घोषित केली.यानंतर त्यांनी राजीनामा देण्याऐवजी घटना बदलण्याकरिता बिल सभागृहात आणल, काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थाकरिता बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या धजीया उडवल्या आणि आता संविधान बदलणार म्हणून खोट नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत केले आणि आता विधानसभा निवडणुकीतही सुरू आहे. हे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ यातला प्रकार असल्याची टीका केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच कधीच संविधान बदलणार नाही. असा विश्वास ही त्याची व्यक्त केला आहे. ते आज कोल्हापुरात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

    अर्थव्यवस्थेच मॉडेल निवडलं ते रशियाला बघून होत

    दरम्यान नितीन गडकरी यांनी इचलकरंजी येथील शहापूर येते झालेल्या सभेत जोरदार भाषण केलं मात्र त्यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रप्रेम हे देखील दाखवून दिल. व्यापार वाढवायचा असेल तर पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज आहे. यासाठी 4 महत्वाच्या गोष्टी आहे. यात पाणी , वीज, वाहतूक, आणि संवाद या महत्वाच्या आहे. जो पर्यंत आपण व्यापार उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उभ करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. 1947 साली आपल्याला स्वतंत्र मिळालं पंडित नेहरू पहिले पंतप्रधान झाले. त्यांच्यावर मला कोणतीही टीका करायची नाही मात्र त्यांनी जे अर्थव्यवस्थेच मॉडेल निवडलं ते रशियाला बघून होत. आज लाल झेंडा आणि कम्युनिस्ट विचार रशिया आणि चायना मधून संपला आहे. कम्युनिस्ट पार्टी संपल्या त्यावेळी 3 विचार महत्वाच्या होते. काळानुसार कम्युनिस्ट विचार हे राहिले नाही, या नंतर प्रगती आणि विकास करायचं असेल तर कोणत मॉडेल निवडलं पाहिजे याचा विचार सुरू झाला आणि पंडित नेहरूंनी रशियाच मॉडेल निवडल असे म्हणतात की जिथे राजा व्यापारी असतो तिथे प्रजा भिकारी बनतो. त्यावेळी एअर इंडिया कंपनीमध्ये घाटामध्ये होती. खरंतर टाटा कडून एअर इंडिया विकत घ्यायला नको हवं होतं असेही यावी गडकरी म्हणाले आहेत.
    मूर्खासारखे काहीही बोलत असेल तर त्याची नोंद का घ्या; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

    सरकार ही बिओटीवर चालवण्याचा सल्ला…

    नितीन गडकरी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री झाल्यापासून देशात अनेक चांगले रस्ते नागरिकांना उपलब्ध झाले आहेत. या विषयावर बोलताना नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे महामार्गावरून जाताना दहा तासांचा प्रवास व्हायचा मात्र राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हा रस्ता बांधण्याचा आदेश मला दिला. वेगवेगळे प्रयोग करून 10 तासांचं हे अंतर आता अवघ्या दोन तासावर आलं. तेव्हा विधानसभेचे सदस्य असलेले जयंत पाटील यांनी मला बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा हे तत्व सरकारबाबत का वापरत नाही असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता मात्र आता सगळेच वापरा आणि हस्तांतरित करा वर काढा म्हणत आहेत. अमेरिका धनवान आहे म्हणून रस्ते चांगले आहे असं नाही तर रस्ते चांगले होते म्हणून अमेरिका धनवान झाला. भारतात अनेक रस्ते मंजूर झाले आहेत तसेच आशियातील सर्वात मोठी टनेल 80% बांधून पूर्ण झाली आहे. आम्ही 107 नद्यांमधून जलमार्ग बनवले आहेत. मी तर 250 किलोमीटर बांगलादेश मध्ये घुसून जलमार्ग बनवला आहे. अशी आठवण ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.
    Sharad Pawar News: संरक्षण मंत्री झाल्यावर शरद पवार तातडीने कोल्हापूरला का आले? काय झाले त्या दोन दिवसात
    आवाडेंबाबत घराणेशाहीची टीका हस्यास्पद

    इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासह लोकसभेतही आवडी कुटुंबीयांनी आपल्या कार्यकर्तुत्वाच्या बळावर राजकारणात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे, आवाडे कुटुंबीयांच्या तीन पिढ्या राजकारणात सक्रिय असून सहकाराचं मोठं जाळ या भागात त्यांनी निर्माण केलं आहे, यंदाच्या विधानसभेसाठी राहुल आवाडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कुटुंबाचा राजकीय वारसा सांभाळताना त्यांनीही जिल्हा परिषद सदस्या पासून आपल्या राजकारणाचा श्री गणेशा केला अशा उद्या तरुणाला विधानसभेत पाठवा हे नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास ही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

    जयकृष्ण नायर

    लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *