• Thu. Nov 14th, 2024
    प्रतिभा काकींना एक प्रश्न नक्की विचारणार! मिसेस शरद पवारांची कृती दादांच्या मनाला लागली

    Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीत मोठा धक्का दिला. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पराभवासाठी शरद पवारांनी फिल्डींग लावलेली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीत मोठा धक्का दिला. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पराभवासाठी शरद पवारांनी फिल्डींग लावलेली आहे. पवारांचं कुटुंब अजित पवारांविरोधात प्रचारात उतरलं आहे. त्यामुळे अजित पवारांवर कधी नव्हे ती बारामती पिंजून काढण्याची वेळ आलेली आहे. याबद्दल बोलताना अजित पवारांनी सद्यस्थितीबद्दल काहीसं आश्चर्य व्यक्त केलं.

    बारामतीत प्रचारासाठी इतकं फिरण्याची, गावागावात जाऊन लोकांना भेटण्याची, १००-१५० जणांच्या सभा घेण्याची वेळ का आली, असा प्रश्न एका मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर तो माझा मतदार आहे. त्याला मी मान देतोय. याच्या आधी मी जायला हवं होतं. पण जाऊ शकलो नाही. आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यानं जाता आलं. कारण दिवाळीच्या सुट्टीत कुठेच प्रचारसभा नव्हत्या. त्यामुळे घरी बसून राहण्यापेक्षा मी गावागावात फिरलो. लोकांशी बोललो, असं अजित पवारांनी सांगितलं. Ajit Pawar: दादांना ‘शरद पवार पॅटर्न’ची भुरळ, लोकसभेत गाजलेला फॉर्म्युला वापरणार; बंपर यश मिळणार?
    पवार साहेबांनी पण एका दिवसात ४ सभा घेतल्या. पवार साहेब तर आधी फक्त शेवटच्या सभेला यायचे. ते पण आता घरोघरी फिरत आहेत, याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी प्रचारात उतरलेल्या शरद पवारांच्या पत्नीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. आमच्या प्रतिभा काकी, ज्या मला आईसमान आहेत. त्या गेल्या ४० वर्षांत कधीही अशा घरोघरी जात नव्हत्या. त्याही आता घराघरांत जात आहेत. असं कधीच घडलेलं नव्हतं. मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. अजितला पाडण्यासाठी त्या घरोघरी जात आहेत का? आणि मी तर आम्हा सगळ्या मुलांच्यामध्ये काकींच्या सगळ्यात जवळचा राहिलो आहे. कधीतरी त्यांना भेटल्यावर त्यांना मी हे विचारणार आहे की माझ्यात असं काय कमी होतं?, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या.
    Uddhav Thackeray: मारी बिस्कीट न् खारी बिस्कीट! ठाकरेंचं भाकित २४ तासांत खरं ठरलं; महायुतीकडून ३ VIDEO शेअर
    सुप्रियाच्या, माझ्या निवडणुकीला प्रतिभा काकी कधी अशा फिरल्या नाहीत. साहेबांच्या निवडणुकीला त्या फिरल्या होत्या. पण ते कधी? तर १९६७, १९७२, १९७८, १९८०, १९८५ मध्ये. ९० पासून आम्ही बघायला लागलो. तेव्हापासून यांनी कोणी प्रचार केला नाही. शेवटच्या सभेला यायच्या. पण असं कधी त्या फिरल्या नव्हत्या. असो. ठीक आहे. लोकशाही आहे. प्रत्येकाला अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.

    Ajit Pawar: प्रतिभा काकींना एक प्रश्न नक्की विचारणार! मिसेस शरद पवारांची कृती दादांच्या मनाला लागली

    अजित पवारांच्या विरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास शरद पवार गेले होते. यावरही अजित पवार सविस्तर बोलले. ‘मला त्या दिवशी थोडं आश्चर्य वाटलं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. मी त्यावर टीका करत नाही. पण मी आतापर्यंत सातवेळा विधानसभेचा फॉर्म भरला. एक वेळेला लोकसभेचा अर्ज भरला. कधीही साहेब फॉर्म भरायला यायचे नाहीत. सुप्रियाचे फॉर्म भरायला तीनवेळा मी होतो. कधीही पवारसाहेब सोबत आले नाहीत. परवा मात्र मिरवणूक न काढता चार लोक फॉर्म भरायला गेले. त्यात पवार साहेब होते. आम्हाला आश्चर्य वाटलं. रोहितनं दोनदा फॉर्म भरला. तेव्हाही साहेब सोबत नव्हते. तेव्हा तर आपण एकत्र होतो. मग हा दुजाभाव का, याबद्दल मनात शंका येते, असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी त्यांचा आवाज काहीसा कातर झाला होता.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed