• Thu. Nov 14th, 2024
    अशोक चव्हाणांनी भाजपात जाऊन स्वतःचं राजकारण संपवलं, बाळासाहेब थोरातांची घणाघाती टीका

    Balasaheb Thorat Criticize Ashok Chavan: अशोक चव्हाणांना संपवण्याची गरज नाही, त्यांनी जेव्हा भाजप पक्षात प्रवेश केला, त्यांनी स्वतःच राजकारण स्वतःच संपवलं शिवाय भाजपात जाऊन ते ही संपले, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

    Lipi

    नांदेड : मला संपवण्यासाठी दिल्लीतून फर्मान आलं आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी एका जाहीर सभेदरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले. अशोक चव्हाणांना संपवण्याची गरज नाही, त्यांनी जेव्हा भाजप पक्षात प्रवेश केला, त्यांनी स्वतःच राजकारण स्वतःच संपवलं शिवाय भाजपात जाऊन ते ही संपले, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नांदेडमध्ये हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांच्या राजकारणावर भाष्य केले.

    काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांना सन्मान होता, दिमाखदारपणे फिरत होते, आता त्यांची काय परिस्थिती झाली आहे. नांदेड जिल्ह्यात एक खासदार निवडून आणू शकत नाहीत ते, नाही आमदार निवडून आणता येत. चव्हाण यांनी स्वतःचं राजकारण स्वतःच्या हाताने संपवले आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. चव्हाणांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरून ही थोरात यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस मध्ये १४ वर्ष खूप सोसले असं चव्हाण म्हणत आहेत, काँग्रेसमध्ये राहून त्यांनी खूप पदे सोसली, मुख्यमंत्री पद सांभाळले, सार्वजनिक बांधकाम खातं आपल्याकडे ठेवले, अनेक मंत्रीपद सांभाळली, एवढी पदे संभाळल्याने त्यांना नक्कीच त्रास तर होणार, असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी चव्हाणांना चिमटा काढला.
    मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी

    महाविकास आघाडीला बहुमत मिळणार

    सर्व्हेला आता निवडणूक आयोगाकडून परवानगी नाही. आता हे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धीचे राजकारण आहे. दिशाभूल करण्याचा भाग असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून बहुमत मिळवणार असल्याचे देखील थोरातांनी म्हटले आहे.

    पंतप्रधानाची पण बॅग तपासली पाहिजे

    बॅग तपासणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांची दोन वेळा बॅग तपासण्यात आली. यावर प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधानाची बॅग पण तपासण्याची मागणी केली. निवडणूक आहे आयोगाचे काय अधिकार आहेत ते आपण मान्य केले पाहिजे, ते करत असताना कधी फरक केला नाही पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे मगच तुम्ही निरपेक्षित ठराल, असे काँगेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed