Nawab Malik: भाजपचा ठाम विरोध असतानाही अजित पवारांनी नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली. अजित पवारांच्या या कृतीमुळे भाजपमध्ये मोठी नाराजी आहे.
नवाब मलिक यांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही. अजित पवारांना या विषयातील स्पष्टता आधीच दिलेली आहे. हा निवडणुकीच्या आधीचा मामला आहे. आमच्या भूमिकेत कुठेही बदल झालेला नाही, अशा शब्दांत शेलार यांनी मलिक यांना असलेला विरोध पुन्हा बोलून दाखवला. आम्ही मलिक यांच्या विरोधात प्रचारात करु. सुरेश पाटील यांचा प्रचार करु. सुरेश पाटील शिवसेना एकनाथ शिंदेंचे उमेदवार आहेत, असं शेलार यांनी सांगितलं. मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
Eknath Shinde: शिस्त पाळा! भरसभेत शिंदेंकडून राणा दाम्पत्याला इशारा; अजित पवारांकडूनही कानउघाडणी, विषय काय?
सरकार स्थापनेसाठी १४५ आमदारांचा पाठिंबा लागतो. तेव्हा तर तुम्हाला मलिक यांचा पाठिंबा लागेल ना, असा प्रश्न शेलारांना विचारण्यात आला. त्यावर नाही, नाही, नाही, असं उत्तर शेलारांनी दिलं. ‘नवाब मलिक हा विषय आमच्यासाठी बंद आहे. फुलस्टॉप. त्यांचा पाठिंबा आम्ही घेणार नाही. त्यांच्या बदल्यात पाच आणू आम्ही. पण त्यांचा पाठिंबा घेणार नाही. राज्यपालांकडे समर्थक आमदारांची यादी जाते. त्या यादीत मलिकांचं नाव नसेल,’ असं शेलार ठामपणे म्हणाले.
राज ठाकरेंच्या एकेकाळच्या जवळच्या नेत्याचं निधन; आदित्य ठाकरेंकडून प्रचार सभा रद्द
नेमकं प्रकरण काय?
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्या नेत्यांनी नवाब मलिक यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आले. मलिक यांना अटकदेखील झाली होती. ते काही महिने तुरुंगातही होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. मलिक यांच्या महायुतीमधील प्रवेशाला भाजपनं विरोध केला होता.
Nawab Malik: ‘त्या’ यादीत मलिकांचं नाव नसेल! भाजपचा आक्रमक पवित्रा; फुलस्टॉप म्हणत दादांवर दबाव वाढवला
मलिक अणुशक्तीनगरचे आमदार आहेत. त्यांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी भाजपची भूमिका होती. त्यांनी याबद्दल जाहीर भाष्य केलं होतं. पण भाजपचा दबाव झुगारुन लावत अजित पवारांनी अर्ज भरण्याच्या काही मिनिटांपूर्वी मलिक यांना एबी फॉर्म दिला. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झाले. मलिक आता मानखुर्दमधून निवडणूक लढत आहेत.