• Mon. Nov 25th, 2024
    पंतप्रधान मोदींचा मविआवर घणाघात; मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून थेट नुरा कुस्तीशी केली तुलना

    PM Modi Speech In Solapur Constituency : चाक आणि ब्रेक नसलेली मविआ स्थिर सरकार देऊ शकत नाही, महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं म्हणत पंतप्रधानांनी सोलापुरात मविआवर टीका केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    इरफान शेख, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी १२ मार्च रोजी सोलापुरात आले होते. सोलापुरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीत नुरा कुस्ती आणि रस्सीखेच सुरू आहे. एक पार्टी दिवसभर आपल्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगत असते, तर दुसरी पार्टी आणि काँग्रेसवाले ते दिवसभर नाकारत असतात. निवडणुकी अगोदरच महाआघाडीवाल्यांची ही परिस्थिती आहे, त्यामुळे महाविकास आघाडीवाले महाराष्ट्राला कदापि स्थिर सरकार देऊ शकत नाहीत, असा घाणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
    Nanded News : रोज रोज गावात येऊन काय मुके घ्यायचे का? पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य

    अकरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार

    सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. महायुतीच्यावतीने अकरा उमेदवार नशीब आजमावत आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर शहरातील होम मैदान येथे सभा झाली. सभेत बोलताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
    माजी आमदाराच्या भावनिक पत्राने मतदारसंघातील वातावरण टाईट; मतदानाच्या आधी घेणार निर्णय

    महायुतीला मत द्या, राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल – पंतप्रधान

    पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशात साठ वर्षे राज्य केले. पण, त्यांची विचारसरणी ही समस्या निर्माण करायच्या आणि लोकांना त्या समस्यांमध्ये अडकवून ठेवणे असे काँग्रेस पक्षाचे धोरण राहिलेले आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

    Solapur News : पंतप्रधान मोदींचा मविआवर घणाघात; मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून थेट नुरा कुस्तीशी केली तुलना

    महायुती दूरगामी धोरण आखणार, महायुतीसोबत राहा – पंतप्रधान मोदी

    विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार पाहिजे असेल तर महायुतीसोबत राहा. महायुती सरकार दूरगामी धोरण आखणार आहे. महाविकास आघाडीवाले ज्या गाडीतून पुढे जात आहेत, त्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. महाविकास आघाडीची गाडी कोण चालवणार, यावरुन त्यांच्यात मारामारी सुरू आहे. महाविकास आघाडीची गाडी सर्वांत अस्थिर गाडी आहे. हे लोक आपापसांत भांडण्यातच सर्वाधिक वेळ घालवत आहेत, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *