• Wed. Nov 13th, 2024
    ‘तिजोरीची चावी माझ्या हाती, आदिवासी खात्याला निधी देतो पण…’ अजितदादांचा गावितांवर गंभीर आरोप

    Ajit Pawar on Vijaykumar Gavit: ‘राज्याच्या तिजोरीची चावी माझ्या हाती आहे. आदिवासी खात्याला निधी किती द्यायचा मी ठरवतो.’ असे सांगत, मी योजना देतो असे म्हणणाऱ्या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे.

    Lipi

    महेश पाटील, नंदुरबार : ‘राज्याच्या तिजोरीची चावी माझ्या हाती आहे. आदिवासी खात्याला निधी किती द्यायचा मी ठरवतो.’ असे सांगत, मी योजना देतो असे म्हणणाऱ्या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. अजित पवारांनी थेट भाजपाच्याच उमेदवारावर टीका केल्याने जिल्ह्यात महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.

    नवापूर विधानसभेचे महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी विजयकुमार गावितांवर निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते, सिंचनची परिस्थिती वाईट आहे. काही लोकांनी जिल्ह्याचा विकास केलाच नाही. केवळ स्वतःची भावकी, मुलगी यांचीच प्रगती केली.

    ‘माझ्या हातात शिंदे आणि फडवणीस यांनी राज्याची तिजोरी दिली आहे. दूध आणि शेती व्यवसायासाठी आम्ही आदिवासी खात्याला बजेट देतो. मात्र तो शेवटच्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहचत नाही, त्यात गडबडी होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तर आजी माजी आमदारांना संधी दिली एकदा भरत गावितांना संधी द्या, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे.

    अजित पवारांची भाजपच्या उमेदवारावर टीका

    राज्यात भाजप, शिंदे शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी या पक्षांमध्ये युती आहे. मात्र नंदुरबारमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे नवापूर विधानसभेचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारासाठी आले होते. मात्र प्रचार सभेत त्यांनी नंदुरबार विधानसभेचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह परिवारावर टीका केल्याने युतीत वाद असल्याचे स्पष्ट झाले. अजित पवार यांनी डॉक्टर गावितांवर टीका केल्याने जिल्हाभर चर्चा रंगली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed