• Wed. Nov 13th, 2024
    ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय?

    Thane Crime News : ठाण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून निवडणुकीआधी ४१ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये दारू, शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    विनित जांगळे, ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी ऑल आऊट ऑपरेशन राबवले. हे ऑल आऊट ऑपरेशन आयुक्तालयातील पाचही झोनमध्ये राबवण्यात आले. या ऑपरेशन कारवाईत एकूण ३१२ अधिकारी आणि एक हजार २८८ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४१ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

    ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

    ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या दहा पथकांनी रात्री ११ ते पहाटेपर्यंत हे ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि अंबरनाथ परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांची पोलिसांनी चौकशी केली. या ऑपरेशनवेळी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४१ आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
    बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी मनसे नेत्याच्या मागणीला यश; ठाण्यात कारवाईचा बडगा, जाहिरातदारांना पाचपट दंड

    दारू, शस्त्रास्त्र जप्त

    यावेळी ३१ गावठी कट्टे, सात कोयते, पाच तलवारी असे हत्यार जप्त करण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर १७९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या व्यतिरिक्त दारूबंदी कायद्यानुसार ५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १८५ जणांवर कारवाई करण्यात आली. तर पाच लाख ७ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.
    माजी आमदाराच्या भावनिक पत्राने मतदारसंघातील वातावरण टाईट; मतदानाच्या आधी घेणार निर्णय

    १५ नशेबाज जाळ्यात

    ड्रग्ज विक्री आणि सेवन करणाऱ्या विरोधात धडक कारवाई मोहीम राबवण्यात येऊन १५ जणांवर कारवाई करण्यात आली. पाच तास सुरू असलेल्या या मोहिमेत ७४ हॉटेल, ६४ लॉज, ३९ बियर बार, ४२ डान्सबार आदींची तपासणी करून झाडाझडती घेण्यात आली. तसेच एकूण ४७ तडीपार गुंडांना अटक करण्यात आली.

    रेकॉर्डवरील ५९ हिस्ट्रीशिटर, ५० तडीपार, ३१ गुंड अशा एकूण १४० गुंडांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने यावेळी २ हजार १४९ दोषी वाहन चालकांना १८ लाख ५८ हजार ७५० रुपये इतका दंड ठोठावला.

    Thane News : ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय?

    दरम्यान, ठाण्यात बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणातही महापालिकेने कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करण्यात आलेल्या, तसंच महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ५२ जाहिरातदारांवर मोठी कारवाई करत त्यांना तब्बल पाचपट दंड ठोठावला आहे. याप्रकरणी मनसे विधानसभा विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी फौजदारी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी जनहित याचिकाही दाखल केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून बेकायदेशीर होर्डिंग उभारलेल्या जाहिरातदारांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed