• Mon. Nov 25th, 2024

    ट्रॅक्टर-बाईकची धडक, एकजण लांब फेकला गेला, दुसरा वाहनाखाली दबला गेला, दोघांचा हृदयद्रावक अंत

    ट्रॅक्टर-बाईकची धडक, एकजण लांब फेकला गेला, दुसरा वाहनाखाली दबला गेला, दोघांचा हृदयद्रावक अंत

    Washim TRuck And Bike Accident: वाशिममध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

    Lipi

    पंकज गाडेकर, वाशिम: ट्रॅक्टर – दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच गावातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिम – शेलुबाजार मार्गावरील बाकलीवाल विहिरीच्या जवळ घडली आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेले दोन्ही मृत व्यक्ती हे एकाच गावातील रहिवाशी होते. बालू लगड आणि डिगांबर देशमुख अशी मृतांची नाव आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार डिगंबर गुलाबराव देशमुख हे काटा गावाकडून दुचाकीवर वाशिमकडे जात होते. तर बालू दगडू लगड हे वाशिमकडून काटा गावाकडे ट्रॅक्टरने जात होते. दोन्ही वाहन वेगात जात असताना बाकलीवाल यांच्या विहिरीजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यावेळी दुचाकीवर जाणारे देशमुख लांब रस्त्यावर फेकले गेले, त्यामुळे त्यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडे जाऊन पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक वाहनाखाली दबल्या गेला आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला.
    BJP Leader Murder: मोठी बातमी! भाजप नेत्याची हत्या, भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत संपवलं, सांगली हादरली
    अपघात झाल्याची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून शवविच्छेदन केले. रात्री त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    अपघातात मृत्यू झालेले ४८ वर्षीय बालू लगड आणि ६८ वर्षीय डिगंबर देशमुख हे दोघेही काटा या एकाच गावातील रहिवाशी होते. डिगंबर आणि बालू दोघेही एकमेकांना सुपरिचित होते. समोरासमोर वाहन धडकून झालेल्या अपघातात दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Washim News: ट्रॅक्टर-बाईकची धडक, एकजण लांब फेकला गेला, दुसरा वाहनाखाली दबला गेला, दोघांचा हृदयद्रावक अंत

    देशमुखांनी दिली दत्त मंदिर बांधण्यासाठी जागा दान

    अपघातात मृत्यू झालेले डिगंबर देशमुख यांच्या शेतात एकमुखी दत्ताचे मंदिर असून मंदिरासाठी त्यांनी जागा दान दिली आहे. ते दत्ताचे परमभक्त होते. दरवर्षी ते येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करायचे. त्यांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed