सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. राणेंनी आता तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मेळावे घेण्यास आजपासून सुरुवात केली. कणकवली शहरात मेळावा घेतल्यानंतर राणेंनी फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात संवाद मेळावा घेतला.
या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कालच राणेंना ७२ वा वाढदिवस झाला. याचे औचित्य साधत या मेळाव्यात देखील राणेंचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. उमेदवार जाहीर होण्याआधी दिवस कमी राहिल्याने आपण मोदींचे कार्य घेऊन लोकांपर्यंत जात आहोत. मोदींच्या बाजूने वन साईड मतदान करण्याचे लोकांना विनंती या मेळाव्यातून करतो असे राणेंनी सांगितले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कधी निवडणूक येते आणि मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करतो, अशी घाई लोकांना लागली असल्याचे ही नारायण राणे यांनी सांगितले.

दरम्यान शुभकार्याला जाताना जसे देवाच्या पाया पडतो, तसाच आता लोकसभेला सामोरे जायचं आहे, तर आधी कणकवलीकरांना सामोरा जातोय. त्यांना मी नमस्कार करतो, अशी भावनिक साद केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली शहर महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात घातली.