• Mon. Nov 25th, 2024
    जागतिक कंपवात दिन निमित्त विशेष कार्यक्रम, पार्किन्सन्स रुग्णांचा अनोखा कलाविष्कार

    मुंबई : जागतिक कंपवात अर्थात पार्किन्सन्स दिनाच्या निमित्ताने ‘पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसॉर्डर सोसायटी (PDMDS)’तर्फे दादर येथील वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कंपवाताच्या रुग्णांनी एकत्र येऊन अनोखा कलाविष्कार सादर केला.

    पार्किन्सन्स म्हणजेच कंपवात. मेंदूच्या पेशींचा ऱ्हास आणि मेंदूतील डोपामाईन केमिकलची मात्रा कमी झाल्याने होणारा हा एक आजार आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या हालचाली, बोलणं, स्मृती इत्यादींवर परिणाम दिसून येतो. भारतामध्ये पार्किन्सन्सचे ५० लाखांहून जास्त रुग्ण आहेत. हा आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी विविध उपचार पद्धतींमुळे त्याला नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

    ‘पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसॉर्डर सोसायटी (पीडीएमडीएस)’ ही संस्था बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. भिम सिंघल यांनी २००१ साली स्थापन केली. आज PDMDS ची देशभरात एकूण ७० हून अधिक केंद्रे आहेत. त्याचबरोबर ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी जीवनशैली’ या अंतर्गत ११२ वृद्धाश्रम व समूहगटात सेवा दिल्या जातात. या आधार गटांमध्ये कंपवाताच्या रुग्णांना तज्ज्ञांकडून मोफत शारीरिक, मानसिक, वाचा, इ. उपचार दिले जातात.
    ज्येष्ठ ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचे निधन; God Particleचे उलगडले होते रहस्य
    ११ एप्रिल हा दिवस जागतिक पार्किन्सन दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. याा दिवसाच्या निमित्ताने PDMDS तर्फे ‘वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (दादर)’ येथे एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्य्रक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पिडीलाईट ग्रुपचे श्री. एम. बी. पारेख व विशेष अतिथी म्हणून श्रीमती कल्पना पारेख उपस्थित होते.

    या कार्यक्रमात कंपवाताच्या रुग्णांनी एकत्र येऊन अनोखा कलाविष्कार सादर केला. या मार्फत रुग्णांच्या नृत्य, गायन व इतर विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळाले; पार्किन्सन्स होऊनही जिद्द न गमावता अशा विविध कलागुणांच्या आणि कालोपचाराच्या माध्यमातून एक आनंदी जीवन जगता येऊ शकते, हा संदेश रुग्णांनी सर्वांना दिला. भारतात कंपवाताच्या आजाराविषयी जनजागृती करण्याचे कामसुद्धा या दिवसाच्या निमित्ताने करण्यात आले.
    अधिक माहितीसाठी संपर्क साधा : 9987216057
    संकेतस्थळ: www.parkinsonssocietyindia.com
    ईमेल: [email protected]

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *