• Sat. Sep 21st, 2024
श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी पूर्वेश सरनाईकांची रणनीती, कल्याणमध्ये निरीक्षक नियुक्त

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या युवासेनेने कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कल्याण लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांत शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निरीक्षकांच्या दोनच दिवसांपूर्वी नेमणुका केल्या होत्या. आता युवासेनेतून कळवा-मुंब्रा विधानसभेतील कळवा निरीक्षकपदी प्रसाद कळसुले, मुंब्रा निरीक्षकपदी अश्फाक चौधरी, डोंबिवली विधानसभा निरीक्षकपदी निखिल वाळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अन्याय होणार नाही, पुनर्वसन करु, भावना गवळींची समजूत काढण्याचा प्रयत्न, उदय सामंतांची शिष्टाई निष्फळ
कल्याण ग्रामीण विधानसभा निरीक्षकपदी विकेश भोईर, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षकपदी नितेश गजमल, उल्हासनगर विधानसभा निरीक्षकपदी हेमंत पमनानी आणि अंबरनाथ विधानसभा निरीक्षकपदी उत्कर्ष आर्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवतारेंना कोणाचा फोन? प्रश्नावर अजितदादांचा पारा चढला, तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी सांगायचं…Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

विशेष म्हणजे, कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात कळवा आणि मुंब्रा भागासाठी स्वत्रंत निरीक्षक नेमण्यात आले असून, तरुण नेत्यांची ही सर्व फळी ठाण्यातील आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या माध्यमातून संघटना मजबूत करणे, पक्षाची ध्येय धोरणे तरुण वर्गापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवणे, नवमतदारांपर्यंत पोहोचणे अशा जबाबदाऱ्या या निरीक्षकांवर राहणार असल्याची माहिती युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed