• Sat. Sep 21st, 2024
कार्यकर्त्यांसह मिहीर दवते यांची मनसेला सोडचिठ्ठी, म्हणाले- सध्यातरी राजकारणाला विराम

डोंबिवली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिला आहे. हा निर्णय पटत नसल्याने मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मनसेला राम राम ठोकला. यानंतर डोंबिवलीमधील मनसे शहर संघटक मिहीर दवते आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. बदलत्या भूमिकेमुळे मतदारांसमोर जाणे अवघड होते. त्यामुळे आम्ही पक्षाचे काम थांबवत आहोत, असे दवते यांनी सांगितले.
माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका नाहीतर… प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा
दरम्यान मनसे शहर संघटक मिहीर दवते हे शिवसेना शिंदे गट किंवा ठाकरे गटात जाऊ शकतात, अशी एक चर्चा डोंबिवलीत रंगू लागली होती. याबाबत मिहीर यांनी सांगितले की, सर्वच पक्षात माझे पहिल्यापासून मित्र आहेत. ते आज नाही. त्यामुळे सध्या मी कुठल्या पक्षात जाईल, याचा निर्णय मी घेतलेला नाही, सध्यातरी राजकारणाला आमचा विराम असेल. राज साहेबांनी आम्हाला राजकारणात ओळख दिली. पण त्याच बरोबर २०१० साली झालेल्या केडीएमसी महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतर आम्ही सुद्धा काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर झुंज दिली.

भाकरी फिरवली पाहिजे, नाहीतर ती करपते; सरकारही फिरवलं पाहिजे, नाहीतर जनता करपेल सुषमा अंधारे

१० वर्ष सिटींग नगरसेविका असलेल्या सौ. मंगलाताई सुळे यांना पराभव पत्करावा लागलेला. त्यानंतर देखील २०१५ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत मोदी लाटेतही आमचे भले भले मातब्बर ५०० मत पण घेऊ शकले नाहीत. तेच आम्ही टिळकनगर सारख्या भाजपच्या गडात फक्त आमची संघटना बांधणी आणि वैयक्तिक संबंधामुळे एक हजारच्या घरात मतं घेतली होती. राज साहेबांची मराठी बद्दलची असलेली कट्टरता हीच आमची दक्षिणा आहे, असे आम्ही समजतो. संघटना कुटुंबाप्रमाणे होती. पण गेल्या ७ – ८ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. संघटनेतील हेवा दाव्यांमुळे पक्षाचे होत असलेल्या नुकसानाचे आम्हाला भागीदार बनायचे नाही, असेही दवते यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मिहीर दवते हे कोणत्या पक्षात जाणार की राजकारणापासून लांब राहणार हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed