• Sun. Nov 10th, 2024
    शिंदे गटाच्या आमदाराच्या वाहनाची वकिलाच्या कारला धडक, महिलेसह तिघे जखमी, कन्हानमधील घटना

    नागपूर: रामटेकचे आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांच्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यात महिला वकिलासह दोन्ही कारचे चालक जखमी झाले. ही धडक एवढी जोरदार होती की महिला वकिलाची कार रस्त्याच्या खाली खड्डयात उतरली. नागपूर -जबलपूर महामार्गावरील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केरडी फाटा परिसरात ही अपघाताची घटना घडली. आमदार जयस्वाल यांचा चालक कारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्हानमधील सभास्थळी जात होता. घटनेच्यावेळी आमदार जयस्वाल हे कारमध्ये नव्हते.
    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! अखेर दहा दिवसांनंतर खरेदीला सुरुवात, ४५०० क्विंटल कांद्याची आवक
    अॅड. मनीषा राऊत (४५, रा. भंडारा), दोन्ही कारचे चालक मनोज सुधाकर गोतमारे व मिलिंद डोंगरे,अशी जखमींची नावे असून, राऊत या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर धंतोलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राऊत या रामटेक न्यायालयात सरकारी वकील आहेत. बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास राऊत व चालक एमएच-३६-झेड-८१८३ या क्रमांकाच्या कारने नागपूरहून रामटेकला जायला निघाल्या. याचवेळी चालक मनोज गोतमारे व पुरुषोत्तम हे दोघे जयस्वाल यांच्या एमएच-४०-बीटी- १७१७ क्रमांकाच्या कारने रामटेकहून कन्हानला जात होते.

    भर उन्हात प्रचार, घामाघूम दानवेंनी लिंबूपाणी घेतलं पण दुकानदाराला द्यायला पैसेच नव्हते?

    मनोज हा कार वेगाने चालवत होता. केरडी फाटा परिसरात मनोजचे कारवरील नियंत्रण सुटले. कार लेनच्या बाहेर निघून समोरुन येणाऱ्या राऊत यांच्या कारवर आदळली. कार रस्त्यावरून खाली खड्ड्यात पडली. यात तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना आधी कन्हानमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. राऊत या गंभीर जखमी असल्याने त्यांना नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत कन्हान पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नव्हता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed