• Sat. Sep 21st, 2024
राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात घातले, वडेट्टीवारांची सडकून टीका

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा बिनशर्त आणि फक्त नरेंद्र मोदींनाच असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी राज्यातील सर्व मनसे सैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. आता यावरुन राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. याबाबत विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत वडेट्टीवारांनी राज ठाकरेंना शेळीची उपमा दिली आहे. सभेआधी वडेट्टीवारांनी राज ठाकरेंना वाघाचा कोल्हा झाल्याचे म्हटलं होतं.
फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसेचा बिनशर्त पाठिंबा, अखेर राज ठाकरेंनी घोषणा केली!नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’ या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आम्हाला राज्यसभा नको आहे. बाकीचे संभाषण आम्हाला नको आहे. हा पाठिंबा फक्त नरेंद्र मोदींना आहे. माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे. चांगली संस्था तयार करा. मतदारसंघ तयार करा. तुम्ही विधानसभेची तयारी सुरू करा, असं विधान राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केले आहे.यावर आता विजय वडेट्टीवारांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले, राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले तेव्हाच ते भाजपसोबत जाणार हे मराठी जनतेला कळले होतं. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असं वाटलं नव्हतं. दिल्लीत जाऊन वाघाची शेळी झाली. राज ठाकरेंसारख्या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखडं गळ्यात घातले का? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंवर विजय वडेट्टीवारांनी सडकून टीका केली आहे.

व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका, मतदारांना राज ठाकरेंचं हात जोडून आवाहन

मात्र आता राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर काही परिणाम होणार नाही. २०१९ मध्ये त्यांनी मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र आता राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींनाच पाठिंबा दिला. म्हणजेच दाल में कुच तो काला है. कदाचित भाजपने राज ठाकरेंची एखादी नस दाबली असावी, यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी त्यांना धारेवर धरलं आहे. राज ठाकरे आधी थोडेसे झुकले होते, आता कमरेतून झुकले. मात्र आता हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही, असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed