• Sat. Sep 21st, 2024
पालघरमध्ये बविआचा उमेदवार, लवकरच नाव जाहीर करू, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

म. टा. वृत्तसेवा, वसई : पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार, वसई महापालिका सदस्यांमधील असलेले बहुमत, ग्रामपंचायत अशा अनेक ठिकाणी बविआचा झेंडा आहे. त्यामुळे पालघर लोकसभेच्या जागेवर बहुजन विकास आघाडीचा हक्क असून आम्ही ही निवडणूक हक्काने लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या ४-५ दिवसांमध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेबहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतर्फे भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ‘जिजाऊ’ संघटनेतर्फेदेखील पालघर मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महायुतीत राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे. परंतु हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष निवडणूक लढविणार की नाही याबद्दल गेल्या काही दिवसांपासून साशंकता व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आमच्याकडे सात ते आठ इच्छुक उमेदवार असून सर्वांना विश्वासात घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालघर जिल्ह्यात चौरंगी लढत होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

चौरंगी लढतीत जिंकण्याचा आनंद वेगळा, राजू शेट्टी जिंकतीलच!; कार्यकर्त्यांना विश्वास


माझे सर्व पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी बविआला पाठिंबा द्यायला हवा, असा सल्ला त्यांनी सर्व मित्रपक्षांना दिला. महापालिका निवडणूक असो वा विधानसभा, त्यावेळी सर्वपक्षीय आमच्या विरोधात येतात. त्यामुळे निवडणुक हीच अशा वेळी युद्धभूमी असते. मागील निवडणुकीच्या वेळी बहुजन विकास आघाडीचे चिन्ह इतर पक्षाने पळवून नेले होते. निवडणूक जवळ आली की चिन्ह पळवून नेण्यासारखे छुपे वार विरोधक करतात. मात्र मला चिन्ह कुठलेही मिळाले तरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते घरोघरी अवघ्या ८ दिवसांत चिन्ह पोहचवले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढे जागा निवडून आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाकडे ज्याचे लक्ष असेल त्याला पाठिंबा दर्शविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed