• Tue. Nov 26th, 2024

    नांदेड जिल्‍ह्यात मतदानाच्‍या दिवशीचे सर्व आठवडी बाजार बंद राहणार

    ByMH LIVE NEWS

    Apr 9, 2024
    नांदेड जिल्‍ह्यात मतदानाच्‍या दिवशीचे सर्व आठवडी बाजार बंद राहणार

    नांदेड दि. ९ : नांदेड जिल्‍ह्यातील जे विधानसभा क्षेत्र नांदेड, हिंगोली व लातूर मतदार संघात येतात त्‍या ठिकाणी मतदानाच्‍या दिवशी आठवडी बाजाराच्‍या तारखांमध्‍ये बदल केला आहे. मतदानाच्‍या दुसऱ्या दिवशी याठिकाणी बाजार भरणार आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांनी  तसे आदेश निर्गमित केले आहेत.

    या ठिकाणी २६ एप्रिलला बंद

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 83-किनवट, 84-हदगाव व 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील 85-भोकर, 86-नांदेड उत्तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड या 8 विधानसभा मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

    शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी हदगाव तालुक्यात हदगाव, किनवट तालुक्यात इस्लापूर, माहूर तालुक्यात सिंदखेड, अर्धापूर तालुक्यात अर्धापूर, धर्माबाद तालुक्यात करखेली, कारेगाव फाटा, नायगाव खै. तालुक्यात बरबडा, देगलूर तालुक्यात माळेगाव म., बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहर, आदमपूर, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद, जांब बु. तर नांदेड येथील साठे चौक ते आयटीआय रस्ता, शिवाजीनगर ते ज्योती टॉकीज रोड तसेच गोकुळनगर ते रेल्वेस्टेशन या मार्गावर व रोड क्र. 26 येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 27 एप्रिल 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

    याठिकाणी ७ मे रोजी बंद

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील 88-लोहा या विधानसभा मतदारसंघात मंगळवार 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

    मंगळवार 7 मे 2024 रोजी लोहा तालुक्यातील मारतळा, कलंबर व लोहा येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार 8 मे 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed