• Sat. Sep 21st, 2024

बळीराजाबद्दल आस्था नसणाऱ्यांना खुर्चीतून हटवा, शेतकरी प्रश्नावरून पवारांची मोदींवर सडकून टीका

बळीराजाबद्दल आस्था नसणाऱ्यांना खुर्चीतून हटवा, शेतकरी प्रश्नावरून पवारांची मोदींवर सडकून टीका

बारामती : राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतापाण्याची स्थिती वाईट आहे. पाण्याचे संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवायची वेळ आली. थोड्या दिवसाने चारा छावण्या काढण्याचा कार्यक्रम करावा लागेल आणि हा दुष्काळात सापडलेला घटक आहे, त्याला बाहेर कसे काढायचे याचा विचार करावा लागेल. दुर्देवाने ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या गोष्टीच्या संबंधीची आस्था नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. त्याचवेळी हे सरकार हटवून योग्य कारभार करणाऱ्यांच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन पवार यांनी केले.शरद पवार यांनी बारामती येथे दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. दुष्काळ आणि निवडणूक दोन्ही सुरू असून त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन जिथे दुष्काळी स्थिती आहे त्याची माहिती घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच देशात लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने त्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांशी संवादही साधणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
साताऱ्यातून शरद पवारांचा खंदा शिलेदार शशिकांत शिंदे मैदानात, १५ तारखेला अर्ज भरणार

कांद्याच्या धोरणावरून शरद पवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

एका बाजूने महागाई आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतीमालला किंमत नाही. आपण सगळे जिरायत भागातले लोक आहात. जिरायत भागातले एक महत्त्वाचे पीक कांदा हे आहे. आता त्या कांद्याला दोन पैसे मिळत नाहीत. महाराष्ट्राच्या बाहेर कांद्याला किंमत मिळते, कांदा निर्यातीची मागणी केली, मोदी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कांद्याच्या किमती खाली आल्या. मोदी सरकार इथेच थांबले नाही, परदेशातून कांदा मागवायचा हा निकाल त्यांनी घेतला आणि त्या सगळ्याची किंमत जिरायत भागात कांद्याचं पिक घेणारा जो शेतकरी आहे त्याला द्यावे लागत आहे.
विशाल पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यांचे प्रमुख नेते समजूत काढतील, सांगली आमचीच, संजय राऊतांनी ठणकावलं

उत्पादनाची खर्च वाढतोय आणि मालाची किंमत कमी होतेय

संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतापाण्याची स्थिती वाईट आहे. पाण्याचं संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवायची वेळ आली. थोड्या दिवसाने चारा छावण्या काढण्याचा कार्यक्रम करावा लागेल. परंतु या परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढण्याची सत्ताधाऱ्यांची इच्छा नाही. या भागात साखर कारखाने आहेत. साखरेला २ पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षा आहे. पण साखर निर्यात करायची नाही हा निकाल मोदी सरकारने घेतला. काही भागामध्ये सोयबिनचे पिक घेतले जाते. आज सोयबिनच्या किमती खाली आलेल्या आहेत. म्हणजे शिवारात जे पिकवायचं त्याचा उत्पादनाचा खर्च काही कमी होत नाही. पण त्यांनी पिकवलं त्याची किंमत मात्र कमी होते, असे दुहेरी संकट आज मोदी सरकारने आपल्या सगळ्यांच्या समोर आणलंय, असे पवार म्हणाले.

जे दम देतात त्यांना माहित नाही त्यांना त्या जागेवर बसवणारा मी आहे | शरद पवार

योग्य कारभार नसणाऱ्यांना खुर्चीतून हटवावे लागेल

काळ अडचणीचा आहे आणि त्याच काळात निवडणूक निघाली आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचा अधिकार हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो अधिकार आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करून या निवडणुकीमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा कारभार योग्य नसेल तर योग्य कारभार आणण्याचा निकाल आपल्याला या निवडणुकीमध्ये घ्यावा लागेल, असे आवाहन पवार यांनी जनतेले केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed