• Sat. Sep 21st, 2024
भाजप प्रवेशाआधीच रक्षा खडसेंच्या पोस्टवर एकनाथ खडसेंचा फोटो

निलेश पाटील, जळगाव: राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार हे येत्या पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार असल्याचे खुद्द एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले. मात्र त्यांचा प्रवेश होण्याआधीच भाजपच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी सोशल मीडियावर एकनाथराव खडसे यांचा फोटो असलेली पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.एकनाथराव खडसे हे तीन वर्षानंतर पुन्हा घरवापसी करत आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना बळ मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मात्र खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. इतकेच काय तर मागील काही दिवसांमध्ये भाजपला कुत्रं विचारत नसल्याचे खडसे यांनी वक्तव्य केले होते.
विरोध करत रहा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेऊन दाखवणार, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये २०२० ऑक्टोबर मध्ये एकनाथ खडसे यांनी मुंबईमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते की, भाजपने माझ्यामागे ईडी लावली की मी त्यांच्या मागे सीडी लावेल. मात्र खडसेंच्या मागे ईडी, सीबीआय सर्व लागले. परंतु खडसेंची सीडी अद्यापही बाहेर आली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात ही देखील चर्चा आहे. एकनाथ खडसे हे भाजपात यावे ही देखील खासदार रक्षा खडसे यांची इच्छा होती. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवले होते, की जी जनतेची इच्छा आहे. खडसे भाजपात यावे तीच माझी इच्छा देखील असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी एकंदरीत आवाहन केले होते.

खडसे हे मागील आठवड्यात दिल्लीवरून परतले तेव्हा ते भाजपात जाणार या चर्चा सुरू होत्या. त्यांनी तीन दिवसांपूर्वीच मुंबई येथे प्रसारमाध्यमांना मी भाजपमध्ये प्रवेश करणार हे जाहीर केले आहे. दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत एकनाथ खडसे हे त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे होते. मात्र या निवडणुकीमध्ये एकत्र खडसे त्यांच्यासोबत नसणार हे देखील त्यांनी खंत महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला बोलून दाखवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये एकनाथराव खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याने खा रक्षा खडसे यांच्या पाठीमागे पुन्हा खंबीर उभे असणार, यावरून दिसून येत आहे.

जनता हीच सर्वश्रेष्ठ हे सगळ्या राजकीय पक्षांना मानावं लागेल; राजू शेट्टींनी निवडणुकीचा निकाल सांगितला

रावेर लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. त्या पोस्टमध्ये ‘एक बार फिरसे रक्षाताई खडसे आणि सिद्ध कर्तुत्व. युवा नेतृत्व या आशयाची पोस्ट आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे फोटो त्या पोस्टवर टाकण्यात आले आहे. याआधी खडसे हे राष्ट्रवादीत होते. तेव्हा रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचा फोटो टाकणे टाळले होते. मात्र एकनाथराव खडसे हे भाजपात येत्या पंधरा दिवसांमध्ये प्रवेश करणार असल्याचे खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. आज रक्षा खडसेंच्या सोशल मीडिया पोस्टवर एकनाथ खडसे प्रवेशाआधीच झळकले या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed