• Mon. Nov 25th, 2024
    तानाजी सावंतांना धाराशिव लोकसभेतून उमेदवारी मिळण्यासाठी धनंजय सावंतांचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन

    ठाणे: शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आक्रमक झाला आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडावी किंवा अर्चना पाटील यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना धाराशिव लोकसभेतून उमेदवारी मिळावी या मागणीसाठी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी धाराशिवची जागा शिवसेनेकडे घेऊन उमेदवारी न दिल्यास धनंजय सावंत अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
    नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाआधीच रक्षाताईंच्या पोस्टरवर खडसे, भाजप प्रचाराला सुरूवातमुख्यमंत्री शिंदे यांनी भेटण्याची वेळ दिली आहे. तो मतदारसंघ शिवसेनेचा असल्याने मिळावा ही कार्यकर्त्यांची आग्रही मागणी असल्याचे कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. धाराशिव मधील लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला दिल्यानंतर धनंजय सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानी बाहेर दाखल झाले आहेत. तसेच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साडेनऊ वाजता भेट होणार होती. मुख्यमंत्री शिंदे धाराशिव जागेचा तिढा सोडवले का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    २६ दिवस तयारी करुन आमदार झालो, आपण नेहमी तयार असतो : राजू पाटील

    हा पारंपारिक मतदारसंघ शिवसेनेचा असल्याने तो आपल्याकडे यावा यासाठी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे. तसेच शंभर टक्के मतदारसंघ राखण्यात यश येईल, असा विश्वासही यावेळी जिल्हापरिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed