• Sat. Sep 21st, 2024
वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटनाच बदलू… जानकरांच्या वक्तव्यावर आंबेडकरी संघटनांकडून निषेध

धनाजी चव्हाण, परभणी : दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटना बदलून टाकू असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी संघटनांकडून याचा निषेध नोंदवण्यात आला. आज आंबेडकरी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंबेडकर पुतळ्याजवळ जानकर यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली.

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे शहरांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत होते. त्यावेळेस एका वृत्तवाहिन्यच्या प्रतिनिधीशी ते संवाद साधत होते. त्याचवेळी एक मराठा तरुण त्या ठिकाणी आला आणि त्यांनी जानकरांना मराठा आरक्षणाविषयी विचारले. जानकर यांनी त्या युवकाला मराठा आरक्षण देण्यासंबंधी माझी भूमिका ठाम आहे. मराठा समाजाला सध्या जे दहा टक्के आरक्षण मिळाले आहे, त्यासाठी देखील मी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. पण तरुणाने हे दहा टक्के आरक्षण टिकणार नाही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करा असेही तो जानकरांना म्हणाला.
परभणीतून अर्ज भरणाऱ्या ‘फकीर’ महादेव जानकर यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर
त्यावर जानकरांनी त्या तरुणाला शांत करत मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असं सांगितलं. आता मी खासदार होऊन दिल्लीला जाणार आहे. पंतप्रधान मोदींना मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडेल असेही ते म्हणाले. वेळप्रसंगी राज्यघटनेत बदल करावा लागला, तरी आपण बदल करू पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी तिसऱ्यांदा PM बनावेत, कट्टर चाहत्याने बोट कापून देवीला अर्पण केलं, रक्ताने ‘मन की बात’ लिहिली!
युवकाशी बातचीत करतानाचा तो व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला. यामध्ये महादेव जानकर म्हणाले होते, की वेळ पडल्यास आपण राज्यघटना बदलू याच वाक्याचा समाचार घेत आंबेडकर संघटना आक्रमक झाली आहे. राज्यघटना बदलण्याची भाषा करणाऱ्या जानकरांचा निषेधही नोंदवण्यात येत आहे. मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर जानकरांचा निषेध नोंदवण्यात येत होता.
शिंदे गटाच्या खासदारांचं टेन्शन वाढलं; पदाचा गैरवापर करत लाखोंचं अनुदान मिळवलं, शेतकरी नेत्याचे गंभीर आरोप
पण आज सकाळी भदंत मोदीतानंद यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या आंबेडकर संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचं निवेदनही देण्यात आलं. निवेदन दिल्यानंतर या संघटनांच्या प्रतिनिधींनी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जानकरांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.

माझी पीए वैगेरे नाही, मी थेट लोकांशी बोलतो, जनता हीच माझी संपत्ती; जालना दौऱ्यात जानकर भरभरुन बोलले!

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की संविधान बदलू म्हणून जाणीवपूर्वक हे वक्तव्य करून जाणकारांनी मनुवादी विचारसरणीचा परिचय दिला आहे ही बाब संविधान प्रेमी कदापि खपवून घेणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सध्या सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर भदंत मोदीतानंद, नागेश सोनपसारे, आशिष वाकोडे, अर्जुन पंडित, संजय सारणीकर यांचे हस्ताक्षर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed