• Sun. Nov 10th, 2024
    लंके-विखे राजकीय संघर्ष टोकाला, शिव्यांची लाखोली, गोळ्या घालण्याची भाषा, ऑडिओ क्लीप व्हायरल

    अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यातील राजकीय संघर्ष उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच टोकाला पोहचण्याच्या बेतात आहे.

    पारनेर तालुक्यातील एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून यामध्ये विखेंच्या विजयाचा अंदाज सांगण्याऱ्याला धमकी आणि शिव्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय डॉ. विखे यांना उद्देशूनही शिव्या आणि धमक्या देण्यात आल्या आहेत. धमकी देणारा व्यक्ती लंके यांच्या मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. याविरोधात विखे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. तर लंके यांच्याकडून या प्रकाराचा आपल्याशी संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
    प्रचाराचा नारळ फोडला, पदाधिकारी भरसभेतून उठून गेले, नीलेश लंके यांच्यावर काँग्रेसच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ

    यासंबंधी माहिती अशी की पारनेर तालुक्यात रविवारी एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यात दोन व्यक्तींचा संवाद आहे. फोन करणारी व्यक्ती लंके यांच्या मीडिया सेलमधून बोलत असल्याचे आणि लंके यांच्यासमोरच त्यांनी हा फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी हा फोन कळस गावाच्या माजी उपसरपंचाला जाब विचारण्यासाठी लावला आहे. या माजी उपसरपंचाने मीडियाला मुलाखत देताना विखे पाटीलच विजयी होतील, असा दावा केला असून, त्यासंबंधी त्यांना जाब विचारला जात आहे.
    खंदा समर्थकांकडून करेक्ट कार्यक्रम? सुजय विखे पाटलांना फुल्ल सपोर्ट, मात्र निलेश लंकेंच्या गडाला सुरुंग लावण्याचा निश्चिय

    विखे पाटील यांच्या विजयाचा अंदाज का वर्तविला असे विचारून शिव्या आणि धमक्या यामध्ये देण्यात आल्या आहेत. विखे यांचाही शिवराळ भाषेत उल्लेख असून त्यांनाही यात धमक्या दिल्याचे ऐकू येते. ही क्लीप व्हायरल झाल्यावर पारनेर तालुक्यात दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू झाली.

    जनतेनं हातात घेतलेली निवडणूक, विखे पाटलांना जनताच उत्तर देईल | निलेश लंके

    विखे यांच्या समर्थकांनी याचा तीव्र निषेध केला आहे. यामध्ये धमकी देणारा नाना नावाचा व्यक्ती लंके यांच्या मीडिया सेलचा पदाधिकारी असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये विखे यांना उद्देशूनही धमकी दिली असल्याने निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
    नीलेश लंकेंना आव्हान; अजितदादांनी काय त्रास दिला ते सांगा

    तर दुसरीकडे या कथित व्हायरल क्लीपशी संबंध नसल्याचे लंके समर्थकांचे म्हणणे आहे. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल होऊन अधिकृतपणे प्रचार सुरू होण्याआधीच असे प्रकार घडू लागले आहे. त्यामुळे यंत्रणेला पारनेर तालुक्यात विशेष लक्ष देण्याची गरज पडण्याची चिन्हे आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed