• Mon. Nov 25th, 2024
    भैरवगडावर भ्रमंतीला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, पर्यटक गंभीर जखमी, उपचार सुरू

    पुणे: हरिश्चंद्र गडाशेजारील कोथळे भैरवगडावर भ्रमंतीसाठी गेलेल्या पुण्यातील १३ पर्यटकांवर रविवारी दुपारी मधमाशांनी हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र पर्वतारोहण बचाव समन्वय समितीचे (एमएमआरसीसी) कार्यकर्ते आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पर्यटकांना रुग्णालयात दाखल केले. काही पर्यटक गंभीर जखमी झाले असून त्यांना गडाच्या पायथ्याला असलेल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
    वायुसेनेत अधिकारी असल्याची बतावणी, महिलेवर वारंवार अत्याचार, ब्लॅकमेल करत खंडणी उकळलीपुण्यातील नितेश बापट आणि त्यांचा तेरा जणांचा ग्रुप रविवारी भैरवगडावर भ्रमंतीसाठी गेला होता. गिर्यारोहणाच्या मार्गावर चालत असताना मधमाशांच्या मोहळाने सगळ्यांवर हल्ला केला. काही कळाच्या आत अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही पर्यटक गडाच्या दिशेने पळाले तर काही उताराच्या मार्गावर वळाले. अनेक मधमाशांनी चावा घेतल्याने काही पर्यटक बेशुद्ध पडले. काहींना उलट्या झाला. पासणे गावातील संरपंच भास्कर बादड आणि गिर्यारोहक नवनाथ कोळी यांनी मदतीसाठी हेल्पलाइनवर फोन केल्यावर मी लगेच स्थानिक टीम आणि वन विभागाशी संपर्क साधून आमचे पथक पाठवले.वन परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे आणि त्यांच्या टीमने वनकर्मचारी आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन जखमी पर्यटकांना राजुरच्या रुग्णालयात हलवले, अशी माहिती एमएमआरसीसीचे समन्वयक ओंकार ओक यांनी दिली. संध्याकाळपर्यंत सर्व पर्यटकांना गावात आणण्यात यश मिळाले. जखमी पर्यटकांना राजूर आणि कोतळू गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पर्यटकांशी संवाद साधून मधमाशाच्या हल्ल्याची माहिती जाणून घेतली. मधमाशांच्या हल्ल्याचे कारण कळू शकले नाही.

    यंदा नारायण राणेंच्या पराभवाचा चौकार, तर कोल्हापुरात विष्णूचा १३ वा अवतारही पराभूत होईल : संजय राऊत

    आम्ही नियमित गिर्यारोहणाला जातो. आत्तापर्यंत असा प्रकार कधीच घडला नव्हता. गडावर चढत असताना आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, त्यावेळी आमच्याकडील काकड्या पाहून माकड जवळ आली. त्यांना हुसकावून लावत असताना काही कळायच्या आता मधमाशांच्या मोहोळ आमच्या दिशेने आला. मधमाशांनी पाठलाग केल्यामुळे सगळेच घाबरले. बचाव पथक आणि वन कर्माचाऱ्यांची मदत झाली. जखमी झालेल्यांना वैद्यकीय उपचार मिळाले असून सगळे सुरक्षित आहेत, असं गिर्यारोहकाने सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed