• Mon. Nov 25th, 2024
    परभणीत मराठा समाजाचा प्रतिनिधी निवडणुकीच्या रिंगणात, सुभाष जावळे लोकसभेचे उमेदवार

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : मराठा आरक्षण प्रश्नावरून गावागावात मोठा रोष असल्याने मराठा बांधव राजकीय पर्याय देण्याचा विचारत करत आहे. त्याच विचारातून परभणीच्या मराठा संघटनांच्या वतीने सुभाष जावळे यांना उमेदवार म्हणून उभे करण्यात आले आहे. ज्या पुढार्‍यांना गावबंदी केली होती तेच पुढारी आता गावागावांमध्ये जाऊन मताचे मागणी करत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागामध्ये प्रचंड रोष आहे. मराठा आरक्षणाबरोबरच परभणी जिल्ह्याचा विकासही म्हणावा तसा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी केला नाही, असा आरोप करून म्हणूनच मराठा उमेदवार दिला असल्याचे सुभाष जावळे यांनी सांगितले.परभणी जिल्ह्यातील मराठा संघटनांच्या वतीने सुभाष जावळे यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत रामेश्वर शिंदे, नितीन देशमुख, गजानन जोगदंड, विठ्ठल तळेकर हे प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मराठा संघटनांचे प्रतिनिधी देखील यावेळेस उपस्थित होते.
    परभणीत संजय जाधवांना खासदारकीच्या हॅट्ट्रिकची नामी संधी, शिवाजीराव देशमुखांची बरोबरी करणार?

    पुढे बोलताना सुभाष जावळे म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते की ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना निवडणुकीत पाडा. पण त्यांना पाडण्यासाठी कोणाला तरी निवडणूक रिंगणात उभे करावे लागते. कोणाला तरी कडू कारले तोडावे लागतील. त्यामुळेच मराठा संघटनांनी हा उमेदवार उभा केला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये तीन-तीन नद्या आहेत पण शेतकरी मात्र आत्महत्या करत आहेत. येथील लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे प्रश्न सुटावे यासाठी सभागृहामध्ये प्रश्न मांडत नाहीत. जिल्ह्यात काळी कसदार जमीन असून देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत, ज्यामुळे रोजगार देखील उपलब्ध झालेला नाही. परभणी जिल्हा भकास झालेला आहे आणि हे बदलायचे असेल तर चांगला सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उभा राहणे आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीकडून तशा पद्धतीचा सक्षम उमेदवार नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे”.
    वंचितने ऐनवेळी उमेदवारी बदलला, परभणीतून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी फॉर्म भरला

    परभणी लोकसभेचे विद्यमान खासदार यांनी परभणी जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी कसल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्याचा निधी परत गेला. जिल्ह्यात रस्त्याचे, पाण्याचे, बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. रेल्वेचे प्रश्न सोडवण्यात आले नाहीत. परभणी जिल्ह्यात विकास करण्याचे काम करण्यात आले. पण या विद्यमान प्रतिनिधींनी याविषयी काहीच केले नाही, अशी टीका सुभाष जावळे यांनी केली.

    माझ्याकडे पैसे नाहीत, ‘जगात जर्मनी भारतात परभणी’ हेच माझं लक्ष्य, महादेव जानकरांचं परभणीत भाषण

    महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे पण या जानकरांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. त्याचबरोबर महादेव जानकर हे बाहेरील आहेत. यापूर्वी देखील बाहेरचा उमेदवार परभणी जिल्ह्यातून आमदार झाला. पण त्यांनी अद्यापही साधे तोंड देखील दाखवले नाही. आमदार होऊन गेल्यावर आम्ही देखील त्याचे नाव विसरून गेलो आहोत. विप्लव बाजोरिया आहेत की बाजेरीया आहेत हे देखील आम्ही विसरून गेलो आहोत. बाजेरिया सारखेच महादेव जानकर देखील आहेत, अशी टीका देखील यावेळी करण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *