• Mon. Nov 25th, 2024
    भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रचार, कोथरुडकरांकडून रवींद्र धंगेकरांना ४२ हजारांचा निधी, तुम्ही लढा!

    आदित्य भवार, पुणे : अनेक वर्ष भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या कोथरूड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज प्रचार केला आहे. महाविकास आघाडीचा मेळावा आज कोथरूड भागात पार पडला. आजच्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. सोबतच लोकसभागातून ४२ हजाराचा निधी देखील धंगेकर यांना सुपूर्द केला.कोथरूड मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपाचा प्रभाव राहिलेला आहे. २००९ चे शिवसेनेचे आमदार राहिलेले चंद्रकांत मोकटे, जे युती सरकार मध्ये होते. त्यानंतर २०१४ भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी कोथरूड मधून निवडून आल्या आणि २०१९ ला चंद्रकांत पाटील हे निवडून आले. दरम्यान भाजपने कोथरूड मतदारसंघात घरोघरी आपली छाप पोचवली. उच्चभ्रू सोसायटीपासून ते वाड्या-वस्त्यांमध्ये भाजपने विविध उपक्रम राबवले. त्यामुळे भाजप आणि कोथरूड हे समिकरण गेली वर्षांवर्ष चालत आलं आहे. त्यामुळे धंगेकर यांनी कोथरूड मतदारसंघातून लीड मिळणं खूप अवघड परिस्थिती आहे.
    भाजपमध्ये येण्यासाठी माझा कधीही प्रयत्न नव्हता, पण…. एकनाथ खडसेंनी पक्षप्रवेशाचं कारण सांगितलं
    पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी जोरदार प्रचरला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या सर्व मतदारसंघात ते गाठीभेटी, मेळाव्याच्या माध्यमातून घेत आहे. आज कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात आमदार रवींद्र धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने जमा केलेला निधी धंगेकर यांना भेट म्हणून दिला. त्यासोबत कार्यकर्ते म्हणले “आम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती माहिती आहे. त्यामुळेच आम्ही लोक सहभागातून जमा केलेला निधी फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात तुम्हाला भेट म्हणून देत आहोत”. जमा केलेली रक्कम चिल्लरपासून नोटांपर्यंतचा निधी धंगेकर यांना दिला.
    पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने परिस्थितीसमोर हात टेकले, आयुष्याचा दोर कापण्याचा कटू निर्णय, चिमुकली पोरकी
    यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, जनतेचे प्रेम हेच माझे बळ आहे. मी आर्थिक अडचणीत आहे, असे आजवर कोणाला सांगितले नव्हते. पण, न सांगताही कार्यकर्त्यांना, जनतेला मनातले कळते. यातून माझे आणि जनतेचे नाते किती घट्ट आहे, हेच दिसते. जनतेसोबत असलेले आपुलकीचे नाते टिकून असल्यानेच मी या निवडणुकीत विजयी होणार, असा मला विश्वास आहे. जनतेचे ऋण मी कधीही विसरणार नाही.
    मोदी तिसऱ्यांदा PM बनावेत, कट्टर चाहत्याने बोट कापून देवीला अर्पण केलं, रक्ताने ‘मन की बात’ लिहिली!

    सुनेत्रा पवार अन् रवींद्र धंगेकरांची पुण्यात भेट; हलक्या-फुलक्या गप्पा अन् चेष्टामस्करी

    लोकसभेची उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने, महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांच्यावर नवा विश्वास टाकला आहे. अचानक ही नवी जबाबदारी धंगेकर यांच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचण भासू नये, म्हणून त्यांच्या कुटुंबातील एक घटक म्हणून आम्ही लोक सहभागातून जमा केलेली रक्कम त्यांना आज दिली. हा निधी जमा करताना दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतची मदत कोथरुडकर नागरिकांनी केली आहे, अशी माहिती कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे ब्लॉक उपाध्यक्ष विजय खळदकर यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed