• Mon. Nov 25th, 2024

    भाजपमध्ये येण्यासाठी माझा कधीही प्रयत्न नव्हता, पण…. एकनाथ खडसेंनी पक्षप्रवेशाचं कारण सांगितलं

    भाजपमध्ये येण्यासाठी माझा कधीही प्रयत्न नव्हता, पण…. एकनाथ खडसेंनी पक्षप्रवेशाचं कारण सांगितलं

    निलेश पाटील, जळगाव : विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माहिती देत आपल्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केला आहे. एकनाथ खडसे यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी दिल्ली येथे भेट घेतली. त्यांच्याकडे मी भाजप प्रवेश करावा ही इच्छा व्यक्त केली. येत्या पंधरा दिवसाच्या आत दिल्ली येथे केंद्रीय नेतृत्वांच्या हातून माझा भाजपात प्रवेश होणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितलं. तसंच त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपमध्ये जाण्याचं कारणही सांगितलं आहे.
    भाजप प्रवेशावर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, सर्व चर्चांना पुर्णविराम देत म्हणाले- लवकरच…
    भाजपमध्ये येण्यासाठी माझा कधीही प्रयत्न नव्हता. पण भारतीय जनता पार्टीमध्ये काही जुने नेते पदाधिकारी आहेत, त्यावेळी चर्चा होताना विषय निघाला की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पाहिजे होते. माझी राजकीय परिस्थिती बघितल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही हे त्यांना सांगितलं होतं,श असंही खडसे यांनी जळगावात बोलताना सांगितलं.
    पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने परिस्थितीसमोर हात टेकले, आयुष्याचा दोर कापण्याचा कटू निर्णय, चिमुकली पोरकी
    हा माझा निर्णय आहे. मला वाटले की मी स्वगृही परत गेलं पाहिजे, भारतीय जनता पार्टी हे माझे घर आहे. या घराच्या पायाभरणीपासून काहीना काही प्रकारचे मी योगदान दिलेले आहे. ४० ते ४२ वर्ष मी त्या जुन्या घरामध्ये होतो. काही कारणांमुळे, माझ्या नाराजीमुळे घराच्या बाहेर पडलो आणि आता ती माझी नाराजी दूर झाल्यामुळे मी पुन्हा माझ्या घरात येत आहे, असं म्हणत त्यांनी भाजपमध्ये अर्थात स्वगृही परतण्याची त्यांची भूमिका मांडली आहे.
    शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; रिक्षाचा चक्काचूर
    दरम्यान, एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांचेही आभार मानले. संकटकाळात मला शरद पवार यांनी आधार दिला. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता माझी परिस्थिती मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितली असल्याचं खडसे म्हणाले.दरम्यान, एकनाथ खडसेंसोबत रोहिणी खडसेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र रोहिणी खडसे यांनी एक ट्विट करत, आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्या रोहिणी खडसे या महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असून त्या भाजप प्रवेश करणार नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *