• Sat. Sep 21st, 2024
गिरीश महाजनांना त्यांची जागा दाखवण्यासाठीच जळगावात शिवसेनेचा उमेदवार दिला, संजय राऊत कडाडले

स्वप्निल एरंडोलकर, सांगली: गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत, त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी, असं आव्हान संजय राऊतांनी गिरीश महाजनांना दिलं आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, बेळगावमध्ये नेहमी भाजपकडून एकीकरण समिती आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न असतो. मराठी माणसाचा संघटन मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसांनी निवडणूक लढवणे गरजेचे आहे, असे ही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

जळगावात भाजपला निवडणूक जड जाणार?

भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाला ही निवडणूक जड जाणार आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात १९९१ नंतर पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे या गटाला ही जागा मिळाली आहे. त्यामुळे या जळगाव लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने विशेष लक्ष ठेवले असल्याचे दिसून येत आहे. कारण, याआधी भाजप आणि शिवसेना ही जळगाव लोकसभा जागा एकत्रितपणे लढत होते. त्यामुळे शिवसेनेला ही जागा लढवता आली नाही, म्हणून भाजपाचा या ठिकाणी जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवार हा निवडून येत असतो.

नौटंकी बंद करा, नाहीतर सांगलीकर तुम्हाला माफ करणार नाही; संजय राऊतांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाला ही जागा त्यांच्या वाट्याला आली आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षफुटीनंतर या लोकसभा मतदारसंघातील तीन आमदार हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. मात्र, हे शिवसेना धनुष्यबाणावरती निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकंदरीत बघता जळगाव लोकसभाची जागा शिवसेना ठाकरे गटाला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यात चाळीसगाव मतदार संघातील उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने अधिकच शिवसेनेला ही जागा लढवण्यासाठी बळ मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed