म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : यंदा उन्हाळी सुट्टीसाठी छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून ४१ मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक गाड्या पुण्याकडे सोडण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही शहरांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे.उन्हाळी सुट्टयांमध्ये दर वर्षी एसटी विभागाच्या वतीने जादा बसची व्यवस्था करण्यात येत असते. उन्हाळी सुट्टयांच्या काळात लग्नाचेही मुहूर्त जास्त असल्याच्या कारणाने एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असते. या काळात नियमित बसमधून प्रवाशांची गर्दी वाढत असल्यामुळे जादा बसचे नियोजन करण्यात येत असते. यंदाही उन्हाळी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयातून करण्यात आलेल्या नियोजनात सिडको, सिबीएस, पैठण, सिल्लोड, वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि सोयगाव येथील आगारातून विविध शहरांसाठी विशेष बस सेवा चालू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयातून करण्यात आलेल्या नियोजनात सिडको, सिबीएस, पैठण, सिल्लोड, वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि सोयगाव येथील आगारातून विविध शहरांसाठी विशेष बस सेवा चालू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोणत्या आगारातून कोणत्या शहरासाठी
सिडको आगार – अकोला, पोहरादेवी, मेहकर, गंगाखेड; तसेच परभणी मार्गे जांब समर्थ
सीबीएस आगार- अकोला, नागपूर, बुलढाणा
पैठण पुणे
सिल्लोड पुणे, बुलढाणा, अकोला, शहादा, जळगाव
वैजापूर पुणे, बुलढाणा, नाशिक, नांदेड, मालेगाव
कन्नड लोणार, धुळे, लातूर
गंगापूर पुणे, अक्कलकोट, संगमनेर, मालेगाव, शिर्डी
सोयगाव जळगाव, भुसावळ
सर्वाधिक गाड्या पुण्यासाठी
या नियोजनात सर्वाधिक जादा बस पुणे शहरासाठी सोडण्यात आल्या आहेत. पैठणहून तीन जादा बस पुण्यासाठी देण्यात आल्या आहेत. सिल्लोड, वैजापूर आणि गंगापूरहूनही पुण्यासाठी बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकोल्यासाठी सिडको, सीबीएस, सिल्लोड येथून जादा बस आहेत. बुलढाण्यासाठी वैजापूर, सिल्लोड, सीबीएस येथून नियोजन करण्यात आले आहे.