मधुकर गायकवाड, मंचर : गायींच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी ‘पराग मिल्क फूड्स लिमिटेड’ची उपकंपनी असणाऱ्या ‘भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म’ला अमेरिकेतून दोनशे टन चारा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध झाला आहे. या चाऱ्यामुळे दररोज दूध उत्पादनात किती वाढ होणार, याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर भारत आणि अमेरिकेत करार होऊन देशातील दूध उत्पादकांना माफक दरात चारा पुरविण्याचे नियोजन केले जाणार आहे.मंचर येथील भाग्यलक्ष्मी डेअरी फार्ममध्ये साडेतीन हजारांहून अधिक गायींचे आणि बोटा गावाजवळ १५ हजारांहून अधिक गायींचे व्यवस्थापन करण्यासाठी विस्तार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ‘यूएस फोरेज कौन्सिल’चे संचालक जॉन स्झेपेन्स्की यांच्यासह ग्रेग जॅक्सन, माइक हाजनी, स्टीव्ह टिंगी यांच्यातर्फे ‘भाग्यलक्ष्मी’ला गवत पुरविण्यात आले आहे. या वेळी त्यांनी पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा, सचिन शहा, संजय मिश्रा, एडमंड पायपर, डॉ. अमोल हांडे, अतुल मंडलिक आणि अनिकेत थोरात यांच्या बरोबर चर्चा केली.
दररोज चारा सेवन करणाऱ्या गायींची चाचणी घेतली जाईल. उत्पादनात होणारा बदल लक्षात घेऊन अमेरिकेच्या पथकासमवेत चर्चा करून अहवाल सादर करण्यात येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दर्जेदार चारा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– देवेंद्र शहा, चेअरमन ‘पराग मिल्क फुड्स’, अवसरी खुर्द