• Sat. Sep 21st, 2024
४६ वर्ष पाण्यात राहूनही सुस्थितीत, उजनी जलाशयातील पळसनाथ मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळले

दीपक पडकर, इंदापूर : उजनी धरणाचं उपयुक्त पाणी यंदा लवकरच संपुष्टात येऊन मृतसाठ्यातीलही पाणीसाठा छत्तीस टक्के झाला आहे. त्यातच सध्या बिकट पाणी परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातूनच पाणी सोडण्यात येत असल्याने मृतसाठ्यातील पाणीसाठाही खालावला जाणार आहे यामुळे लवकरच उजनी धरणात गडप झालेल्या गावखूणा उघड्या पडण्याच्या मार्गावर आहे.

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर सध्या उघडे पडू लागले असून लवकरच ते पूर्णपणे खुले होण्याच्या मार्गावर आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सुमारे ४६ वर्षांपूर्वी पुनर्वसित झालेल्या अनेक गावाच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसू लागल्या आहेत. उजनी जलाशयामध्ये पाण्याखाली गेलेले प्राचीन श्री. पळसनाथाचे मंदिर एक हजार वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले हे मंदिर आहे. हे मंदिर मागील ४६ वर्ष पाण्यात राहून आजही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. वास्तुशास्त्र अभियंते आणि कारागीर, इतिहासप्रेमी, विद्यार्थी, भाविक, पर्यटक, हौशी छायाचित्रकार या ठिकाणी आवर्जून भेट देतात .
पुणे – मुंबई महामार्गावरुन प्रवास करताय? पुढील ४ दिवस एक्पप्रेस वेबाबत महत्त्वाची अपडेट
हजार वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री. पळसनाथ मंदिराचे शिखर प्राचीन इतिहासाची साक्ष देत असून पाण्याच्या असंख्य लाटांचे तडाखे खाऊन तग धरून उभा आहे. सप्तभुमिज पद्धतीचे हे शिखर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पळसदेवच्या पुलावरून उत्तर बाजूकडे पाहिले असता स्पष्ट दिसते.

मंदिराच्या गर्भगृहामध्ये अत्यंत कोरीव काम, सभामंडप अत्यंत देखणी मांडणी आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडी खांबावर उभा राहिलेले हे प्राचीन मंदिर आहे. ४६ वर्षापूर्वी पाण्याखाली गडप होऊन या मंदिराचे अर्धवट शिखर उघडे राहिले. मंदिराच्या भोवती असणाऱ्या ओवऱ्या आणि इतर छोटी मंदिरे मंदिराच्या भोवतालचा तट पाण्याखाली गेला. परंतु हे मंदिर आजही तितक्याच दिमाखाने पाण्यामध्ये गेली ४६ वर्ष उभे आहे.
परभणीतून अर्ज भरणाऱ्या ‘फकीर’ महादेव जानकर यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर
या मंदिराच्या केलेल्या अभ्यासानुसार आणि या मंदिरामध्ये सापडलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार हे मंदिर हजार वर्षांच्या आसपास बांधण्यात आले. तेव्हापासून या मंदिराच्या मुख्य भागाला कोणत्याही प्रकारची डागडुजी अथवा पुनर्बांधणी करण्याचा प्रसंग ग्रामस्थांवर आल्याची नोंद नाही. परंतु ४६ वर्षापूर्वी हे मंदिर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासाठी संपादित झालं. नवीन गावठाणामध्ये ग्रामस्थांनी नवीन श्री. पळसनाथ मंदिर बांधले. परंतु जुन्या मंदिराला त्यातील दगडालाही ग्रामस्थांनी हात लावला नाही.
खांदेरी किल्ल्यावरील वेताळाचे दर्शन घेऊन परतणारी बोट समुद्रात पलटी, १५ तरुण पाण्यात पडले
पळसदेवमध्ये बांधण्यात आलेले नवीन मंदिर नव्या धाटनीने बांधण्यात आले आहे. केवळ महादेवाची पिंड आणि नंदीची मूर्तीची नवीन मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या चार दशकाहून अधिक काळ हे मंदिर ऊन, वारा आणि पाऊस आणि पाण्याच्या लाटांचे तडाखे सोसत आजही दिमाखाने उभे आहे.

इंदापूर विधानसभा लढवणारच, अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला, अंकिता ठाकरेंचा इशारा

हे मंदिर अवर्षणाच्या दिवसांमध्ये अधून मधून पूर्णपणे खुले होते. यावेळी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक, पुरातन वास्तूप्रेमी, प्राचीन मंदिर अभ्यासक, विद्यार्थी मोठी गर्दी करतात. अवर्षणाच्या काळामध्ये हे मंदिर उघडे पडल्यानंतर याठिकाणी पर्यटनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed